गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा या गावाजवळ चक्के जेसीबी लावून १४०० झाडे पाडून अतिक्रमण करण्याच्या या प्रकारासाठी जबाबदार धरून जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असलेल्या गायत्री फुलझेले आणि त्यांची दोन मुले प्रणय आणि प्रांजल यांच्यावर वनविभागाने गुन्हा दाखल केला. याशिवाय निळकंठ सिडाम या आरोपीलाही अटक झाली होती, पण त्याची जामिनावर सुटका झाली. गाव समितीच्या सतर्कतेमुळे अतिक्रमण करून जमीन हडपण्याचा फुलझेले कुटुंबाचा प्रयत्न फसला. मात्र आरोपींना अटक झाली नसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष आहे.
(बॉक्स)
वन कर्मचारी व तलाठ्यावरही रोष
या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वन आणि महसूलच्या जमिनीवर दिवसाढवळ्या अतिक्रमण होत असतानाही त्याला रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल वन विभागाचे कर्मचारी आणि गावच्या तलाठ्यावर कारवाई करावी, अशी वन व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी गुरुवारी गडचिरोलीत पत्रपरिषद घेतली. त्यात गायत्री फुलझेले यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करावे, शासनाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई आरोपीकडून वसुल करावी, वृृक्षतोड झालेल्या जागी लवकर वृक्षलागवड करावी. वृक्षतोडीमुळे त्यात अधिवास असलेल्या वाघाने धुमाकूळ घातला, त्याचा बंदोबस्त करावा आदी मागण्या केल्या.