या स्पर्धेमध्ये सुमारे १५0 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात ३0 स्पर्धकांची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, आसाम, मणिपूर, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, पं. बंगाल, लुधियाना, जम्मू अशा विविध राज्यातून स्पर्धक सहभागी झाले हाेते. या स्पर्धेमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव स्पर्धक शिल्पा कोंडावार यांचा सहभाग होता.
यापूर्वी ही एंजल्स अँड डेमॉन्स तसेच इंटरनॅशनल ह्युमन्स राईट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहात घेण्यात आलेल्या ''''''''मिसेस ग्लॅमर्स २०२०'''''''' स्पर्धेत शिल्पाने महाराष्ट्र ग्लॅमर्स बेस्ट ॲटीट्युट व फर्स्ट रनर अप असे दोन प्रथम पुरस्कार पटकाविले होते. सद्य:स्थितीत राजुरा येथील महाविद्यालयात त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आजच्या युवा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी महिला मंडळाच्या माध्यमातून त्या नेहमी पुढाकार घेत असतात. विविध क्षेत्रात विशेष उपक्रम राबवून त्यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली असून महिलांनी न घाबरता कोणत्याही क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे.
लाेकमत समूहातर्फे लाेकमत सखी मंच ही चळवळ गेल्या अनेक वर्षांपासून चालविली जात आहे. महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झालेल्या या लाेकमत सखी मंच चळवळीत शिल्पा काेंडावार या अनेक वर्षांपासून अहेरी उपविभागात संयाेजिका म्हणून काम करीत आहेत.