लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंजमधील बहुचर्चित शिफा ऊर्फ शबाना मोहम्मद शेख व तिचा भाचा मिसार चौधरी यांना अटक करण्यात देसाईगंज पोलिसांना यश आल्यानंतर या प्रकरणी पुढे काय होते याची उत्सुकता आणखी वाढली आहे. या प्रकरणात शिफा व तिच्या सहकाऱ्यांनी लुबाडलेली रक्कम साडेचार कोटीच्या घरात असल्याचा अंदाज पोलीस अधिकाºयांनी व्यक्त केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी गुरुवारी देसाईगंजला भेट देऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच देसाईगंज पोलिसांना तपासाच्या दृष्टीने दिशानिर्देश दिले.अनेक दिवसांपासून फरार असलेल्या शिफाला उत्तरप्रदेशातून अटक केल्यानंतर बुधवारी न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली. पीसीआरमध्ये ती या प्रकरणातील कोणकोणते रहस्य उलगडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिफाकडून फसविल्या गेलेल्या अनेक लोकांनी बुधवारपासून पोलीस ठाण्यात धाव घेत आपली कैफियत पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न केला. काहींनी शिफाला भेटण्याचाही प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी भेट नाकारली. या प्रकरणात ज्यांचे हात गुंतले आहेत, त्यापैकी काही जण देसाईगंजमधून पसार झाल्याचे बोलले जात आहे.अनेकांचे पैसे गुंतलेलेया प्रकरणात गंडविल्या गेलेल्या नागरिकांची संख्या शेकडोच्या घरात आहे. काही मोजक्या लोकांची मोठी रक्कमही शिफाकडे फसली आहे. परंतू तो काळा पैसा असल्याने तक्रार करण्यास ते पुढे आलेले नाही. विशेष म्हणजे नागरिकांकडून पैसे घेताना शिफा किंवा तिचे साथीदार कोणातीही अधिकृत पावती देत नव्हते. केवळ विश्वासावर हा खेळ चालायचा. पण शिफाने विश्वासघात करत नागरिकांना लुबाडले. या खेळात काही गब्बर लोकांचाही हात असून त्यांची नावे केव्हा पुढे येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिफा लुबाडणूक प्रकरण साडेचार कोटीच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:37 PM
देसाईगंजमधील बहुचर्चित शिफा ऊर्फ शबाना मोहम्मद शेख व तिचा भाचा मिसार चौधरी यांना अटक करण्यात देसाईगंज पोलिसांना यश आल्यानंतर या प्रकरणी पुढे काय होते याची उत्सुकता आणखी वाढली आहे. या प्रकरणात शिफा व तिच्या सहकाऱ्यांनी लुबाडलेली रक्कम साडेचार कोटीच्या घरात असल्याचा अंदाज पोलीस अधिकाºयांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले तपासाचे दिशानिर्देश