शिवसेना कार्यालय मूलचेरा : येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशा घाेषणा शिवसैनिकांनी दिल्या. दरम्यान गणेशनगरात वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांना वस्त्रदान करण्यात आले. तसेच त्यांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. यावेळी गौरव बाला, दीपक बिस्वास, राजेश गुंतिवार, सुरजित कर्माकर, राजू मिस्त्री, नीताई कर्माकर, गौतम बैरागी, परसंजीत चक्रवर्ती, परसंजित बिस्वास व शिवसैनिक उपस्थित होते.
देसाईगंज : शिवसेना तालुका शाखेच्यावतीने देसाईगंज येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. दरम्यान वयोवृद्ध शिवसैनिक गोपाल नागोजी चौधरी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर मेश्राम, माजी तालुका प्रमुख बालाजी ठाकरे, जग्गी परसवाणी, प्रशांत किलनाके, आनंदराव वाढई, विजय सहारे, प्रभाकर चौधरी, ज्ञानदेव पिलारे, देवराव बेदरे, योगेश नेवारे, विजय दडमल, रमेश वाढई, महेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.
शिवसेना कार्यालय एटापल्ली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती स्थानिक शिवसेना कार्यालयात साजरी करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख किसन मठ्ठामी, शिवसेना शहर प्रमुख मनीष दुर्गे, युवासेना तालुका प्रमुख राहुल आदे, दामोधर नरोटे, सुरेश करमे, इशांक दहागावकर, प्रसाद दासरवार, राघव सुल्वावार, भुपेन बारोई, सुजल वाघमारे, तनुज बल्लेवार, बोवा पेंदाम, युवासेना शहर प्रमुख महेंद्र सुल्वावार, संतोष गंधेशिरवार, विलास पेरमिलवार व शिवसैनिक उपस्थित होते.
आरमोरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शनिवारी आरमोरी बर्डी येथे साजरी करण्यात आली. या निमित्ताने वृक्षारोपण व उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी होते. यावेळी आरमोरी विधानसभा संघटक राजू अंबानी, महेंद्र शेंडे, बुधाजी किरमे, बाळा बोरकर, माजी जि. प. सदस्य वेणूताई ढवगाये, हेमलता वाघाडे, कल्पना तिजारे, मेघा मने, विजय मुर्वतकर, पप्पू ठेंगरी, गणेश तिजारे, ज्ञानेश्वर ढवगाये, श्यामराव भोयर, विनोद बेहरे, विलास दाणे, अजय हेमके, साई हेमके व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
धानाेरा : शिवसेना तालुका शाखेच्यावतीने धानाेरा येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख मुकेश बोडगेवार, राजू रामपूरकर, संदीप बोडगेवार, पुरुषोत्तम चिंचोळकर, संजय तुलावी, जितेश गुरनुले, विणेश गावडे, वीरेंद्र गावतुरे, किशन चंदेल, पंकज देवीकर, शुभम लेनगुरे, दीपक भूषणवार, शोएब सय्यद, प्रवीण बोडगेवार, हर्षल वाढाई, प्यारा शेंद्रे, अंकुश थुल, अश्विन सोरते, शुभम सलोटकर, संतोष कुमरे, निशांत लांजीकर, राजू मशाखेत्री, भूषण उंदीरवाडे, मुकुल शेंद्रे, अमन कुमरे, कुणाल येरमे, प्रेम उंदीरवाडे, सुहास कावळे, स्वप्निल गणोरकर उपस्थित हाेते.
गडचिराेली : येथे काॅंग्रेसच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला काॅंग्रेसचे जिल्हा सचिव प्रा. समशेर पठान, युवक काॅंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, नंदू वाईलकर, संजय भट, जितेद्र मुनघाटे, गौरव अलाम, राजू चन्नावार उपस्थित हाेते.