वृक्षारोपण कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादव लोहबरे, संजय बोबाटे, स्वप्निल खांडरे, निकेश लोहंबरे, अमोल मेश्राम, नीलकंठ मेश्राम, राहुल सोरते, चरणदास झाडे, रामजी आतला, सुखदेव कुंभरे, गणपत मडावी, सुनील डांगे, श्रावण कुमोटी, धनेश्वर करंगामी, विलास दाजगये, हरबा दाजगये, डोमाजी लाकुडवाहे, रामदास बह्याळ, उत्तम घोडसे, संजय चांग, महेश झोडे, अविनाश चौधरी, छाया मडावी, शशिकला पदा, वंदना मडावी, ताराबाई किरंगे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ या उक्तीची जाणीव ठेवून प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि त्याचे संवर्धन करावे. भविष्यात पाणी व प्राणवायू याचा तुटवडा निर्माण हाेऊन गंभीर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करावे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शिवसेनेच्या वतीने चातगाव-कारवाफा जिल्हा परिषद क्षेत्रात एक हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, असे उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांनी सांगितले.