उडान फाऊंडेशनचा पुढाकार : विजेत्यांना बक्षीस वितरण, जवानांनीही घेतला सहभाग आलापल्ली : उडान फाउंडेशन आलापल्लीतर्फे शनिवारी वीर बाबुराव चौकात मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेक स्पर्धकांनी या मॅराथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन दौड लावली. मॅराथॉन स्पर्धेनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, सीआरपीएफ ९ बटालियनचे डेप्युटी कमांडंट पवन कुमार, सीआरपीएफ ३७ बटालियनचे असिस्टंट कमांडंट अशोककुमार रियाल, सीआरपीएफ ९ बटालियनचे असिस्टंट कमांडंट सचिन कुमार, अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, मुख्याध्यापक गजानन लोनबले, एटापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एच. जी. मडावी, एलआयसीचे शाखा अधिकारी सावळापुकर, पोलीस उपनिरीक्षक कोळेकर, सचिन वायाळ, अमोल फडतरे, लक्ष्मी तांबूसकर उपस्थित होते. मॅराथॉन स्पर्धेच्या माध्यमातून धावपट्टू निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फाउंडेशन च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. मॅराथॉन स्पर्धेत महिला गटात प्रथम क्रमांक लता मुडमा, द्वितीय क्रमांक पायल आभारे, तृतीय क्रमांक कल्पना पोरतेट यांनी पटकाविला. तर पुरुष गटात प्रथम क्रमांक सुरेंद्र चौधरी, द्वितीय क्रमांक नंदकिशोर मडावी, तृतीय क्रमांक वीणा परसा यांनी पटकाविला. सीआरपीएफ गटात प्रथम क्रमांक मनोज प्रसाद, द्वितीय क्रमांक मुशायद अली, तृतीय क्रमांक गणेश शर्मा यांनी पटकाविला. प्रोत्साहन बक्षीस अन्य स्पर्धकांना देण्यात आले. संचालन दिवाकर मादेशी तर आभार डॉ. चरणजित सलूजा यांनी मानले. मॅराथॉन स्पर्धेच्या यशस्वितेसाठी उडान फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष मंथनवार, उपाध्यक्ष डॉ. चरणजित सलूजा, सचिव रोमित तोम्बलार्वार, सहसचिव गौरव मगर, सदस्य पवन गुप्ता, गणेश बोधनवार, रमन गंजीवार, तिरूपती बोलेवार, बंडू भांडेकर यांनी सहकार्य घेतले. मॅरेथॉन स्पर्धेसाठी क्रीडा भारतीचे जूनघरे, घोडमारे, दिवाकर मादेशी, खिरटकर, सीआरपीएफ ३७ व ९ बटालियन व पोलीस जवानांनी सहकार्य केले.
मॅराथॉनमध्ये शेकडोंनी लावली दौड
By admin | Published: January 01, 2017 1:32 AM