चामोर्शी : लालडोंगरीजवळ असलेल्या मधुकर महाराज बोदलकर यांच्या शेतातील श्री दत्त व नागमंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जंयती उत्सव सोहळा २८ व २९ डिसेंबर रोजी घेण्यात आला. ‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा’ अशा नाम गजराने संपूर्ण परिसर धुमधुमून गेला. कार्यक्रमादरम्यान घटस्थापना, हरिपाठ, रात्री भजन, किर्तन, सकाळी दत्तजन्म पाळना, हरिपाठ, भजन, गोपालकाला करून सांयकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळ भजन पार्टी चाकलपेठ, किर्तनकार विजयानंद महाराज रोडे, मधुकर महाराज बोदलवार, माजी सरपंच मालन बोदलवार, सुनंदा ढाक, विलास कुकडे, होमदेव गडकर, लोमेश बुरांडे, अशोक नवले, मेघराज वालदे, नंदाजी मांडवगडे, सुखदेव गव्हारे, डोनूजी बोदलकर, यमाजी पिपरे, सिंधू कुकडे, पुष्पा रोडे, वनिता पिपरे, रंजना बोदलकर, कल्पना मांडवगडे, मारोती बोदलकर, शंशात बारसागडे, नितेश पिपरे, दीपक वासेकर, खुशाल शेटे, राविन्द्र घोंगडे, गुरुदेव भांडेकर, नानाजी वासेकर, गितेश पिपरे, संदीप बुरे, कालीदास किनेकर आदी भाविक उपस्थित होते.
चामाेर्शीत श्री दत्त जयंती उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:45 AM