लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहक व विक्रेते यांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी असल्याने बाजारात दिवसभर शुकशुकाट दिसून येत होता.सोमवारपासून शासकीय कार्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांना कामावर परतावे लागणार असल्याने बहुतांश कर्मचाºयांरी भाऊबीजेनिमित्त बाहेरगावी गेले आहेत. याचा परिणाम रविवारच्या आठवडी बाजारावर दिसून आला. ग्राहक व विक्रेते यांची संख्या अत्यंत कमी असल्याने बाजारात शुकशुकाट दिसून येत होता.गडचिरोली येथील आठवडी बाजारात गडचिरोली शहरासह ग्रामीण भागातील नागरिक भाजीपाला खरेदीसाठी येतात. त्यामुळे येथील आठवडी बाजारात मोठी गर्दी उसळते. सकाळपासून झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम राहते. मात्र रविवारच्या आठवडी बाजारावर दिवाळीचा परिणाम दिसून येत होता. ग्राहकांबरोबरच भाजीपाला विक्रेत्यांचीही संख्या कमी असल्याने भाजीपाल्याच्या भावावर फारसा परिणाम झाला नाही. विक्रेत्यांची संख्या ग्राहकांच्या तुलनेत अधिक असती तर भाजीपाल्याचे भाव उतरण्याची शक्यता होती.गडचिरोली-मूल मार्गाच्या दोन्ही बाजूला दुकान राहत असल्याने या मार्गावर बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी राहते. मात्र रविवारच्या आठवडी बाजारात या मार्गाच्या बाजूला दुकाने कमी प्रमाणात लागली होती.वाहतूक शाखेच्या पोलिसांनीही पूर्वीप्रमाणेच आठवडी बाजारात बंदोबस्त ठेवला होता. पार्र्किंगच्या जागेवरच वाहन उभे करण्याच्या सूचना देत होते. याचे पालन नागरिकांकडून केले जात होते. काही नागरिक मात्र रस्त्याच्या बाजूच्या खुल्या जागेवर वाहने ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र वाहतूक पोलिसांची शिट्टी वाजताच वाहन पार्र्किंगच्या जागेवर नेऊन ठेवत होते. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होती.कापड दुकानात गर्दी वाढलीभाऊबीजेच्या सणानिमित्त कापड दुकानात मात्र गर्दी वाढली असल्याचे दिसून येत आहे. रात्री ९ वाजता बंद होणारी कापड दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहत आहेत. रात्री ११ वाजेपर्यंत ग्राहकांची गर्दी कापड दुकानांमध्ये दिसून येत आहे.
आठवडी बाजारात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:53 PM
शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहक व विक्रेते यांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी असल्याने बाजारात दिवसभर शुकशुकाट दिसून येत होता.
ठळक मुद्देदिवाळीचा परिणाम : भाजीपाल्याचे दर होते स्थिर; ग्राहक व विक्रेत्यांचीही संख्या कमी