लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : सिकलसेल दुर्धर व जेनेटीक आजार असल्यामुळे सिकलसेल ग्रस्त रुग्णांना रक्तसंक्रमणाची आवश्यकता भासते. सिकलसेल हा अनुवांषिक आजार असला तरी सामूहिक संघर्षातूनच सिकलसेल मुक्ती शक्य आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सिकलसेल रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येते. मात्र ही जनजागृती अद्यापही तोकडीच असल्याचे दिसून येत आहे.सिकलसेल हा रक्तातल्या लाल रक्तपेशीमध्ये होणारा आजार आहे. आपल्या रक्तात लाल पेशी व पांढऱ्या पेशी अशा दोन प्रकारच्या पेशी आहेत. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरातील लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. पण सिकलसेल आजारामध्ये या पेशींचा आकार आॅक्सिजनचा पुरवठा मिळत नसल्याने विळ्यासारखा होतो. इंग्रजी भाषेत विळ्याला सिकल म्हणतात व सेल म्हणजे पेशी म्हणून या आजाराला सिकलसेल आजार असे संबोधले जाते. सिकलसेल आजार अनुवांशीक आहे. गर्भधारनेच्यावेळी जेनेरीक बदलामुळे हा आजार होतो. रक्तदोषामुळे उद्भवणारा हा दुर्धर आजार आहे. जन्मानंतर सिकलसेल रूग्णांच्या स्पर्शाने, त्याचे उष्टे अन्न खाल्याने, कपडे वापरल्याने, शारीरिक संबंध किंवा रक्त दुसºयास संक्रमित केल्याने दुसºया व्यक्तीला सिकलसेल आजार होत नाही. आई किंवा वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक व ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह करणे टाळावे. सिकलसेल वाहक व्यक्ती (एएस) व सिकलसेलग्रस्त व्यक्ती असे दोन प्रकार सिकलसेल रूग्णांचे पडतात. राज्यात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जवळगाव, धुळे, नंदूरबार, रायगड, नांदेड, हिंगोली, पालघर या जिल्ह्यांमध्ये सिकलसेलग्रस्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो.महाराष्टÑ राज्याच्या ३६ जिल्ह्यापैकी २१ जिल्ह्यात लाखो सिकलसेल रुग्ण आहेत. विदर्भातील सर्वच ११ जिल्हे सिकलसेल रोगाने प्रभावित आहेत. राज्यात अडीच लाखांपेक्षा जास्त सिकलसेल रुग्ण एसएस पॅटर्न आहेत. ज्यामध्ये विदर्भातील ११ जिल्ह्यात दीड लाख लोक सिकलसेल प्रभावित आहेत. आरोग्याधाम संस्थेच्या सर्वेक्षणानुसार ८० जातींमध्ये हा आजार आढळून आलेला आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात एसएस व एएस हे दोन्ही पॅटर्न मिळून जवळपास ३२ हजार ४०३ सिकलसेल रुग्ण आहेत. सिकलसेल रोगी जन्मताच अपंग राहतो. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तो अपंग राहतो. या रुग्णांचा अपंगत्व अदृश्य राहतो. सिकलसेल आजार हिमोग्लोबिनशी संबंधित असून तो जीवघेणा आहे. या रोगाच्या समूळ नायनाटासाठी जगात औषधी नाही. सिकलसेल रुग्णांच्या लाल रक्तपेशी २० ते ३० दिवस जीवंत राहतात. यामुळे रोग प्रतिकार शक्ती फारच कमजोर होऊन जाते. सिकलसेल रुग्णांना होणारे जंतू संसर्ग, रक्तक्षय, अल्पायुषी वक्राकार रक्तपेशी आदींमुळे सदर रुग्णांना नेहमी वेदना होत असतात. या वेदनांमुळे रुग्णांची जीवन जगण्याची इच्छा नष्ट होत असते.सिकलसेल रुग्णांचे मुख्य अवयव उदा.मेंदू, डोळे, फुफ्फुस, हृदय, यकृत, मूत्रपिंड, प्लीहा व हाडांचे सांधे प्राणवायूच्या अपुºया पुरवठ्यामुळे कमजोर व कालांतराने अकार्यक्षम होत असतात. परिणामी अल्पायुषात रुग्णाचा मृत्यू होतो.सिकलसेलवरील उपाययोजनासिकलसेल हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारीत होते. त्यामुळे लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर दोघांनीही सिकलसेल रक्ताची तपासणी करावी, सिकलसेल रूग्ण जन्माला येऊ न देण्याचे टाळावे, सिकलसेलवाहक व पीडित व्यक्तीने दुसºया वाहक व पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे, सिकलसेल आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक अॅसीडची गोळी सेवन करावी, असे आरोग्यधान संस्थेचे डॉ.रमेश कटरे यांनी सांगितले.सिकलसेलग्रस्तांना शासनाकडून मिळणाºया सोईसुविधासिकलसेलग्रस्तांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ६०० रूपये अनुदान दिले जाते. या रूग्णांना दररोज मोफत फॉलिक अॅसीड गोळ्या, रक्त पुरवठा, औषध व उपचार प्रदान करण्यात येते. राज्य रक्तसंक्रमण परिषद मुंबईकडून सिकलसेल ओळखपत्र तयार करून दिला जातो. दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रती तास २० मिनिटे अधिकचे दिले जातात.सिकलसेलची लक्षणेहातापायावर सूज येणे, सांधे सूजणे, दुखणे, असह्य वेदना होणे, सतत सर्दी, खोकला होणे, अंगात बारीक ताप राहणे, डोळे पिवळसर दिसणे, हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.
सिकलसेल जनजागृती तोकडीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:22 AM