लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील गट्टा येथे रविवारी १३ गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांची क्लस्टर कार्यशाळा घेण्यात आली. गावातील दारूबंदी, गाव संघटनेचे बळकटीकरण यासह इतरही विषयांवर यावेळी चर्चा झाली. सोबतच गावांमधील दारू व खर्राविक्री बंद व्हावी यासाठी स्वाक्षरी आंदोलन छेडण्याचा संकल्प करण्यात आला.गट्टा, जारावंडी, मोहंडी, कुर्जेमर्का, येरडसमी, गोरगुट्टा, मटवर्षी, वाढवी, नयनवाडी, गर्देवाडा आणि जिलनगुडा येथील महिला व पुरुषांची कार्यशाळेला उपस्थिती होती. यातील अनेक गावांनी खर्राबंदी केली आहे. ही बंदी अशीच टिकून राहावी आणि गावातील तंबाखू विक्रीचे प्रमाण कमी करतानाच घरोघरी गाळली जाणारी दारू कशी बंद करता येईल, याबाबत कार्यशाळेत चर्चा झाली.तालुक्यातील बहुतेक गावे ही आदिवासी बहुल असल्याने येथे पेसा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्याने गावांना स्वत:च्या हिताचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. या कायद्याचा वापर करून पेसा अंतर्गत गावात दारू व खर्राबंदी यशस्वी करण्याविषयी मुक्तिपथ तालुका चमूने मार्गदर्शन केले. दारूमुळे होणारे घरगुती वाद, मारहाण याबाबतचे गावातील अनुभव या कार्यशाळेत महिलांनी सांगितले. दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यासाठी महिलांनी संघटित होण्याच्या उद्देशाने स्वाक्षरी आंदोलन घेण्यात आले.पोलिसांनी दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी अशा मागणीवर गाव संघटनेतील ६० कार्यकर्त्यांसह गावातील शेकडो लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. सोबतच आपापल्या गावात जाऊन अशाच प्रकारे लोकांच्या स्वाक्षºया घेऊन सदर निवेदन तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. याप्रसंगी मुक्तिपथ संघटक किशोर मल्लेवार आणि प्रेरक किशोर येलमुलवार यांनी मार्गदर्शन केले.या कार्यशाळेला गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होते.
दारूबंदीसाठी स्वाक्षरी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:42 PM
तालुक्यातील गट्टा येथे रविवारी १३ गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांची क्लस्टर कार्यशाळा घेण्यात आली. गावातील दारूबंदी, गाव संघटनेचे बळकटीकरण यासह इतरही विषयांवर यावेळी चर्चा झाली. सोबतच गावांमधील दारू व खर्राविक्री बंद व्हावी यासाठी स्वाक्षरी आंदोलन छेडण्याचा संकल्प करण्यात आला.
ठळक मुद्देगट्टा येथे कार्यशाळा : १३ गावातील गाव संघटनेच्या महिलांचा संकल्प