शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

एसडीओ कार्यालयावर धडकला मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:00 AM

देशभरात अतिप्रसंग, विनयभंग व बलात्कार यासारख्या घटना वारंवार घडत असून आरोपींना वेळीच कठोर शिक्षा होत नसल्याने राक्षसी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आरोपी राजेश कांबळे याचेवर बलात्कार करून जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अतिजलद न्यायालयाची स्थापना करून सदर खटला ताबडतोब निकाली काढण्यात यावा.

ठळक मुद्देकठोर शिक्षा देण्याची मागणी : कोंढाळातील बलात्कार प्रकरणाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर फाट्यानजीक ९ डिसेंबर रोजी सायंकाळला एका असाह्य परिचारिकेवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटणेचे देसाईगंज तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले आहे. बुधवारी कोंढाळावासीयांसह परिसरातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. सदर घटनेची आरोपीला कठोर शिक्षा करून पीडित परिचारिकेस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांच्या नावे निवेदन पाठविण्यात आले. या मुकमोर्चात आ.कृष्णा गजबे, नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोती कुकरेजा, जि.प.कृषी सभापती नाना नाकाडे, कोंढाळाच्या सरपंच मंगला शेंडे, जि.प.सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशनी पारधी, पं.स.चे माजी उपसभापती नितीन राऊत, सामाजिक कार्यकर्ते अनिल कुंभलवार, सुनील पारधी, कैलास राणे, पोलीस पाटील किरण कुंभलवार आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. निवेदनात म्हटले आहे की, शिवराजपूर फाट्यानजीकच्या घटनेत परिचारिकेवर बलात्कार करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जीवे मारण्याचा आरोपीचा उद्देश होता, असे स्पष्ट होते. आरोपी राजेश कांबळे याने केलेले हे कृत्य घृणास्पद व निंदणीय असून माणुसकीला काळीमा फासणारे आहे. देशभरात अतिप्रसंग, विनयभंग व बलात्कार यासारख्या घटना वारंवार घडत असून आरोपींना वेळीच कठोर शिक्षा होत नसल्याने राक्षसी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आरोपी राजेश कांबळे याचेवर बलात्कार करून जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अतिजलद न्यायालयाची स्थापना करून सदर खटला ताबडतोब निकाली काढण्यात यावा. आरोपी राजेश कांबळेला कठोर शिक्षा देण्यात यावी. पीडित परिचारिकेला शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तेनुसार शासकीय नोकरी देण्यात यावी. अतिप्रसंगी, विनयभंग व बलात्कारासारख्या घटना घडू नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्या आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ओबीसी महासंघ, माळी समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Rapeबलात्कारMorchaमोर्चा