वैरागड प्राथमिक आराेग्य केंद्राची कोरोना संसर्गापूर्वी सोमवार ते शुक्रवारदरम्यान बाह्य रुग्ण तपासणी १०० पेक्षा अधिक असायची. पण कोरोनाचे रुग्ण वाढले, वाढायला लागले तेव्हापासून सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. बाह्य रुग्ण तपासणी फारच कमी होत असल्याची माहिती आहे. खोकला, सर्दी ताप सांगितल्यानंतर कोरोना चाचणी करून बाधित रुग्ण आढळल्यास १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवतात. या गैरसमजामुळे आजारी रुग्ण सरकारी दवाखान्यात न जाता काही खासगी बोगस डॉक्टरकडून उपचार घेत आहेत. वैरागड आणि परिसरातील सुकाडा, मोहझरी, वडेगाव, करपडा, कोजबी, शिरसी, लोहारा येथे मागील अनेक दिवसांपासून काही बोगस डॉक्टर गावागावात प्रत्येक घरी जाऊन रुग्णांवर उपचार करत आहेत. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रारही करण्यात आली. पण याकडे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.
काेट
खोकला, सर्दी ,ताप असला म्हणजे रुग्ण कोरोनाबाधित असतो तसे नाही. पण अशी लक्षणे असली तर रुग्णांनी स्वतःहून तपासणी करून घ्यावे. गैरसमजापोटी लोक तपासणी करून घेत नाही. तपासणी केली जाते म्हणून सरकारी दवाखान्यात येत नाही. त्यामुळे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
डॉ. विलास वाघधरे, वैद्यकीय अधिकारी, वैरागड
===Photopath===
250421\25gad_1_25042021_30.jpg
===Caption===
वैरागड प्राथमिक आराेग्य केंद्रात असलेला शुकशुकाट