सामाजिक बांधिलकी जाेपासणारे कुटुंब म्हणून उनाडकाट परिवाराची जिल्ह्यात ओळख आहे. गडचिराेली जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या नातेवाईकांसाठी सुरू केलेल्या भोजन वितरण उपक्रमाला सहकार्य दर्शवून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून भोजन वितरण व्यवस्था सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे भोजनालयासह अन्य प्रतिष्ठाने बंद आहेत. याच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत होती. यावर उपाययोजना म्हणून युवक काँग्रेसच्यावतीने रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन वितरण करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमात खारीचा वाटा म्हणून सिंगापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारे डॉ. हेमंत उनाडकाट यांनी आर्थिक सहकार्य केले.
डाॅ. उनाडकाट यांना मायभूमी गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक स्थिती चांगली अवगत आहे. ते स्वत: सिंगापूर येेथे असतानासुद्धा दररोज जिल्ह्यातील हालचालींवर लक्ष ठेवून असतात. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वितरण करण्यात येत असल्याची माहिती कळताच त्यांनी आपल्या नावाचा कुठेही उल्लेख करू नका, असे सांगत त्यांनी युवक काँग्रेसच्या भोजन वितरण उपक्रमाला सहकार्य करून समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला. इतरही नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.
बाॅक्स
भाेजनदान हीच खरी ईश्वर सेवा - डॉ. अद्वय अप्पलवार
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांसमवेत त्यांच्या मदतीला नातेवाईकही येत आहेत. लॉकडाऊन असल्याने नातेवाईकांना इतर बाबींसाठी धावपळ करावी लागते. युवक काॅंग्रेसचा भाेजनदानाचा उपक्रम स्तुत्य आहे. मंगळवार १८ मे राेजी आपण स्वत: भोजन वितरण केले. यावेळी खऱ्या अर्थाने ‘हीच खरी ईश्वर सेवा’ असल्याचा आत्मानुभव आला, असे डॉ. अद्वय अप्पलवार यांनी सांगितले.
===Photopath===
210521\21gad_5_21052021_30.jpg
===Caption===
भाेजनदान करताना युवक काॅंग्रेसचे कार्यकर्ते.