कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून रिक्त पदामुळे तालुक्यातील आरोग्यसेवा ढेपाळली असून शासनाचा सोयीअभावी गंभीर रूग्णांना उपचाराकरिता नजीकच्या तेंलगाणा राज्यात जावे लागत आहे.सिरोंचा तालुक्यात अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा, झिंगानूर आदी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. अंकिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर, कंत्राटी आरोग्य सेवक दोन, आरोग्य सेवक पुरूष पाच, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक, औषधी निर्माता एक, असे एकूण १३ पदे रिक्त आहेत. टेकडाताला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी निर्माता, आरोग्य सहाय्यक महिला, आरोग्य सेवक पुरूष दोन, कंत्राटी स्टाफ नर्स, आरोग्य सेवक पुरूष १२, आरोग्य सेवक माहिला, कंत्राटी आरोग्य सेवक माहिला तीन, परिचर चार असे एकूण २५ रिक्त पदे आहेत. मोयाबीनपेठा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २५ रिक्त पदे असून यात वैद्यकीय अधिकारी वर्ग २ चे २ पदे रिक्त आहेत. औषधी निर्मात्याचे दोन पदे तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक महिला, कंत्राटी आरोग्य सहाय्यक महिला, आरोग्य सेवक पुरूष, आरोग्य सेवक महिलाचे दोन पद कंत्राटी आरोग्य सेवक (महिला)चे तीन पदे रिक्त आहे. कनिष्ठ सहायक, परिचरांचे पाच पद रिक्त आहेत.झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. औषधी निर्माता, आरोग्य सहाय्यक महिला, कंत्राटी आरोग्य सहाय्यक महिला, आरोग्य सेवक पुरूषांचे पाच पद, आरोग्य सेवक महिलाचे एक पद कंत्राटी आरोग्य सेवकचे तीन पद परिचराचे पाच पद असे एकूण १८ रिक्त पदे असून आरोग्य विभागाचे या चारही प्राथमिक आरोग्य केंद्राकडे डोळेझाक होत आहे. एकूण सिरोंचा तालुक्यात मंजुर पदे २१५ असून भरलेले पद १३४ आहे व चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात ८१ पदे रिक्त आहेत.ग्रामीण रूग्णालयात सोनोग्राफीचा अभावसिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयात सोनोग्राफीची सुविधा नसल्यामुळे येथील रूग्णांना चंद्रपूर, नागपूर, वंरगल, करिमनगर, हैद्राबाद यासारख्या शहरात जाऊन तेथील खाजगी रूग्णालयात सोनोग्राफीद्वारे तपासणी करावी लागत आहे. सिरोंचा येथे सोनोग्राफी येथील ग्रामीण रूग्णालयात व्यवस्था केल्यास गरजू गरीब रूग्णांना त्याच्या लाभ मिळेल. शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिरोंचात आरोग्यसेवेचे धिंडवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 1:39 AM
सिरोंचा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून रिक्त पदामुळे तालुक्यातील आरोग्यसेवा ढेपाळली असून शासनाचा सोयीअभावी गंभीर रूग्णांना उपचाराकरिता नजीकच्या तेंलगाणा राज्यात जावे लागत आहे.
ठळक मुद्देवैैद्यकीय अधिकारीही मिळेना : चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात ८१ पदे रिक्त