लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील निम्म्याहून अधिक गणपतींचे मूल मार्गावरील बाजाराजवळील तलावात विसर्जन केले जाते. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नगर परिषदेने पोहणाऱ्या व्यक्तींचे सहा जणांचे पथक तैनात केले आहे.बाजाराजवळील तलाव जवळ पडत असल्याने सर्वाधिक गणेश विसर्जन या तलावात होते. तलावावर पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. या पायऱ्यांवर गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन होते. नगर पालिकेने पोळा सणाच्या अगोदर तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात केली. पायऱ्यांजवळ असलेले गवत काढण्यात आले आहे. त्यामुळे तलाव स्वच्छ दिसत आहे. निर्माल्य गोळा करण्यासाठी या ठिकाणी घंटागाड्या ठेवण्यात आल्या आहेत. तलावाच्या पाळीवर तंबू ठोकून बचाव पथकातील नागरिकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे पायऱ्यावर शेवाळ पसरले आहे. त्यामुळे पाय घसरून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने पायºयावर चूना टाकून शेवाळ नष्ट केले जाणार आहे. विसर्जनस्थळी प्रकाश व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे.
विसर्जनस्थळी सहा जणांचे बचाव पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:42 AM
बाजाराजवळील तलाव जवळ पडत असल्याने सर्वाधिक गणेश विसर्जन या तलावात होते. तलावावर पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. या पायऱ्यांवर गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन होते. नगर पालिकेने पोळा सणाच्या अगोदर तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात केली.
ठळक मुद्देनगर पालिकेची तयारी : तलावाची केली स्वच्छता; रात्री विजेची व्यवस्था