शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

पशुधन योजनांवर सहा कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2016 1:20 AM

जिल्हा नियोजन समिती गडचिरोली मार्फत वार्षिक योजनेत प्राप्त झालेल्या निधीतून बिगर आदिवासी, विशेष घटक, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील

एक वर्ष : जि.प. पशुसंवर्धन विभागाने केला १०० टक्के खर्चगडचिरोली : जिल्हा नियोजन समिती गडचिरोली मार्फत वार्षिक योजनेत प्राप्त झालेल्या निधीतून बिगर आदिवासी, विशेष घटक, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजनांवर मिळून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण ६ कोटी १ लाख २७ हजार रूपयांचा खर्च केला असून खर्चाची टक्केवारी १०० आहे. बिगर आदिवासी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने इमारत बांधकामासाठी जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाला २०१५-१६ या आर्थिक वर्षात २ कोटी ५९ लाख रूपये प्राप्त झाले. विभागाने चार जुने व तीन नवीन अशा एकूण सात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामासाठी २ कोटी ५९ लाख रूपये खर्च केले. संकरीत कालवडी व सुधारीत जातीच्या पारड्यांची जोपासणा या लेखाशिर्षांतर्गत पशुसंवर्धन विभागाने ७५ लाभार्थ्यांना दोन लाख रूपयांचे पशुखाद्य वितरित केले. १३८ पशुवैद्यकीय दवाखाण्यात औषधी पुरवठा करण्यावर एक कोटी रूपयांचा खर्च केला. एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम या लेखाशिर्षांतर्गत १०० तलंगा गट वितरित करून प्राप्त झालेले सर्वच तीन लाख रूपये खर्च केले. एक दिवसीय सुधारीत कुक्कुट पक्षांच्या पिलांचे वाटप या लेखाशिर्षांतर्गत १०० गट वितरित करून आठ लाख रूपये खर्च केले. बिगर आदिवासी योजनेंतर्गत जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने एकूण ३ कोटी ७२ लाख रूपयांचा खर्च केला आहे. विशेष घटक योजनेंतर्गत ७८ शेतकरी गटांना एकूण १५६ दुधाळू जनावरे वितरित करून ५० लाख रूपये खर्च केले. दुबत्या जनावरांना खाद्य वाटप या लेखाशिर्षांतर्गत शेतकरी गटांना दुधाळू जनावरांसाठी खाद्य वितरित करून १० लाख रूपये खर्च केले. विशेष घटक योजनेंतर्गत एकूण ६० लाख रूपयांचा खर्च वर्षभरात करण्यात आला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)