शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

सहा गावातील मजुरांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:07 AM

वर्षभराचा कालावधी उलटूनही तेंदूपत्ता संकलन कामाच्या मजुरीची रक्कम न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या एटापल्ली तालुक्याच्यासहा गावातील मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन संबंधित कंत्राटदाराविरोधात आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : वर्षभरापासून तेंदूपत्त्याची मजुरी प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वर्षभराचा कालावधी उलटूनही तेंदूपत्ता संकलन कामाच्या मजुरीची रक्कम न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या एटापल्ली तालुक्याच्यासहा गावातील मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन संबंधित कंत्राटदाराविरोधात आपला रोष व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात लगबगीने कार्यवाही करून दिवाळीपूर्वी मजुरीची रक्कम अदा करावी, अशी मागणी मजुरांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.राष्टÑवादी काँग्रेस पार्टी तालुका एटापल्लीच्या नेतृत्वात अनेक मजुरांनी थेट गडचिरोली गाठली. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन त्यांच्याशी प्रलंबित मजुरीबाबत चर्चा केली. सदर मजूर राकाँचे एटापल्ली तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी बुर्गी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामा तलांडे, ग्रामकोष समितीचे अध्यक्ष गोसू हिचामी, सैतू रावळे, पोलीस पाटील चंदू गावळे, पेसा ग्रामकोष समितीचे अध्यक्ष मधुकर आत्राम, कोलू तलांडी, बुर्गीचे ग्रा.पं.सदस्य ओकटू ओंडरे, मधुकर पुंगाटी, केसरी गावडे, हरिदास दुर्गे, कटिया परसा आदी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, २०१७ च्या तेंदू हंगामात एटापल्ली तालुक्यातील बुर्गी, मरकल, मरकल टोला, पैमा, करफानफुंडी व अबनपल्ली आदी सहा गावांतील आदिवासी बांधवांनी तेंदूपत्ता संकलनाचे काम केले. कंत्राटदाराशी करार करून तेंदूपत्ता तोडण्याचे काम केले. परंतु सदर एकाही मजुरांना आजतागायत एक रूपयाही मजुरीच्या पोेटी मिळाला नाही. आज ना उद्या मजुरीची रक्कम मिळेल, या आशेने अनेक मजुरांनी आपल्या दैैनंदिन गरजा भागविण्यासाठी कर्ज सुद्धा काढले. मात्र मजुरीची रक्कम न मिळाल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊ न शकल्याने मजूर आता अडचणीत सापडले आहेत. सदर प्रकरणावर तोडगा काढून मजुरीची रक्कम त्वरित अदा करण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.बुर्गी गावातील मजुरांची ९ लाख २१ हजार ३६६ रूपयांची रक्कम मिळणे शिल्लक आहे. मरकल व मरकल टोला या गावातील ३ लाख ९० हजार २२८, पैमा गावातील मजुरांची २ लाख २० हजार ९४०, करफानफुंडी गावातील मजुरांचे ४ लाख १९ हजार ३१८ व अबनपल्ली गावातील मजुरांची ७ लाख ६६ हजार १५० रूपये प्रलंबित आहे. बोनस व मजुरीची मिळून एकूण ५० लाख २५ हजार रूपये प्रलंबित आहेत.तेंदूपत्ता कंत्राटदार कारागृहातमुर्गी, मरकल, मरकल टोला, पैमा, करफानफुंडी व अबनपल्ली आदी सहा गावांतील नागरिकांनी तेंदू संकलन केलेल्या तेंदू युनिटचा कंत्राट परशुराम डोंगरे नामक कंत्राटदारांनी घेतला. डोंगरे यांच्याशी तेंदूपत्ता संकलनाचा करारही करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी कंत्राटदार डोंगरे यांना अटक केली. कंत्राटदार सध्या कारागृहात आहे. या कारणामुळेच तेंदूपत्ता संकलन करणाºया मजुरांना कामाच्या मजुरीची रक्कम मिळू शकली नाही, असे निवेदनात म्हटले आहे. कंत्राटदार कारागृहात असल्याने मजुरी कशी मिळेल, असा सवाल मजुरांनी उपस्थित करून यावर जिल्हा प्रशासनाने काही तरी तोडगा काढावा, अशी विनंतीही या मजुरांनी केली आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा