शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

एका वर्षात सहा जणांचे नेत्रदान

By admin | Published: June 10, 2016 1:33 AM

दृष्टिदानाऐवढे मोठे दान नाही. दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश पोहोचवून जीवन उजळविण्याचे उदात्त कार्य मरणोत्तर पार पाडून सामाजिक ऋण फेडण्याची भूमिका

जागतिक दृष्टिदान दिन : २०१५- १६ मध्ये १ हजार ३६४ मोतिबिंदू व १७ काचबिंदू शस्त्रक्रियागडचिरोली : दृष्टिदानाऐवढे मोठे दान नाही. दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश पोहोचवून जीवन उजळविण्याचे उदात्त कार्य मरणोत्तर पार पाडून सामाजिक ऋण फेडण्याची भूमिका प्रत्येकालाच बजावता येते. असेच उदात्त कार्य जिल्ह्यातील सहा व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदानाने केले आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात २०१५- १६ या वर्षात सहा व्यक्तींनी नेत्रदान करून सामाजिक ऋण फेडले. जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त घेतलेला हा आढावा...जागतिक दृष्टिदान दिन १० जून रोजी दरवर्षी साजरा केला जातो. डॉ. भालचंद्र यांच्या स्मरणार्थ सदर दिवस साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. या दिवशी नेत्रदानाबाबतही नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शरीर स्वास्थ्यासंबंधी सुदृढ आरोग्य असणे गरजेचे असते. जागतिक आरोग्य संघटना व जागतिक एजंसीच्या दृष्टीने व्हिजन २०२० अंतर्गत दृष्टीचा अधिकार कार्यक्रमांतर्गत दृष्टिहीनता निवारण (आयएबीपी) ची सुरूवात १९९९ पासून सुरू करण्यात आली. डब्ल्यूएचओ २०१४ च्या अनुमानानुसार जगात जवळपास २८५ कोटी लोक नेत्रहीन आहेत. यामध्ये ३९ लाख लोक अंध व २४६ कोटी लोक अल्पदृष्टीचे आहेत. दृष्टीदोषांच्या कारणामध्ये असंशोधित अपवर्तकहीनता (४३ टक्के), मोतिबिंदू (३३ टक्के) व अंधत्त्व जवळपास (८० टक्के) आदींचा समावेश आहे. राष्ट्रीय अंधत्त्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करून नेत्रदानाची जनजागृती केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात २०१५- १६ या वर्षात राष्ट्रीय अंधत्त्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सहा लोकांनी मरणोत्तर नेत्रदान केले. तसेच २०१५- १६ या वर्षात १ हजार ३६४ मोतिबिंदू तसेच १७ काचबिंदू रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनात नेत्रतज्ज्ञ डॉ. किरण मडावी व नेत्र चिकित्सा विभागाच्या चमूमार्फत सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. (शहर प्रतिनिधी)