लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी सापळा रचण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा शिकाºयांना वन कर्मचाऱ्यांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे.आशुतोष जतीन बिश्वास रा. गौरीपूर, जतीन फुला बाला रा. बहाद्दूरपूर, शंकर सुकरण घरामी रा. विष्णूपूर, नशिकांत निताई हाजूर रा. विष्णूपूर, विश्वजित फुला बाला रा. बहाद्दूरपूर, गुरूदेव हरूलाल सुतार रा. गौरीपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुकोष सुनील रॉय हा फरार आहे. कोनसरी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या अडपल्ली बिटात वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी सापळे लावले जात असल्याची गोपनिय माहिती कोनसरी येथील वन परिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाºयांना प्राप्त झाली. त्यानुसार वन कर्मचाºयांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली. त्याचबरोबर त्यांच्याकडून तार, चाकू, केन, दोरी, दोन दुचाकी आदी साहित्य जप्त केले.सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. सदर कारवाई वन परिक्षेत्राधिकारी एम. जी. करडभुजे, एम. एन. भुरसेन, शेंडे, एम. गंधलवार, पुजा मडावी, डी. डी. भोसले यांनी केली.
सहा शिकाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:50 PM
वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी सापळा रचण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा शिकाºयांना वन कर्मचाऱ्यांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
ठळक मुद्देरचला जात होता सापळा : अडपल्लीच्या जंगलात कारवाई