शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

सहा लाखांची छत्तीसगडी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:41 PM

छत्तीसगड राज्यातून येणाºया बॉम्बे रॉयल कंपनीच्या व्हिस्कीच्या सहा लाख रुपये किमतीच्या बाटल्या गडचिरोली पोलीस ठाण्यातील कर्मचाºयाच्या दक्षतेमुळे पकडण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई बुधवारी चातगाव-रांगी मार्गावर करण्यात आली. टाटा पीकअप या मालवाहू वाहनातून ही दारू गडचिरोलीकडे येत होती.

ठळक मुद्देगडचिरोलीत वाढतेय आवक : पोलीस कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे पकडले वाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगड राज्यातून येणाऱ्यां बॉम्बे रॉयल कंपनीच्या व्हिस्कीच्या सहा लाख रुपये किमतीच्या बाटल्या गडचिरोली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे पकडण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई बुधवारी चातगाव-रांगी मार्गावर करण्यात आली. टाटा पीकअप या मालवाहू वाहनातून ही दारू गडचिरोलीकडे येत होती.प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली पोलीस ठाण्याचे हवालदार विनोद दुग्गा हे दुचाकीने आपल्या गावाकडून गडचिरोलीकडे येत असताना जीमगाव टी पॉईंटजवळ त्यांना एमएच २७, बीएक्स २११६ हे मालवाहू वाहन संशयास्पद वाटले. त्यांनी वाहनाला थांबण्यासाठी हात दाखविला असता वाहन चालक आणि त्याचा सहकारी वाहन उभे करून पसार झाले. दुग्गा यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात दारूच्या बाटल्यांचे १२५ बॉक्स असल्याचे आढळले. त्यांनी लगेच याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस ठाण्याला दिली. पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी इतर सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि वाहन जप्त केले. अज्ञात वाहन चालक व त्याच्या सहकाºयाविरूद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई ठाणेदार पी.व्ही.चौगावकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पाटील, हवालदार भास्कर चंदनखेडे, भारत रामटेके, विनाद दुग्गा, नायक दिलीप गावडे, चालक गलगट यांनी केली.गडचिरोलीत तयार होते ब्रँडेड कंपनीची बनावट दारूशहरात पुन्हा दारूची आवक वाढत आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमधून हलक्या प्रतिची दारू आयात करून ती नामांकित कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून नव्याने लेबल लावून विकल्या जात आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी पकडलेली ‘बॉम्बे रॉयल’ ही विस्की त्यासाठीच गडचिरोलीकडे येत होती अशी माहिती सूत्रांनी दिली. ही दारू गडचिरोलीतील एका बड्या दारू विक्रेत्याकडे येत असल्याचे समजते. वाहन चालक किंवा त्याचा सहकारी पोलिसांच्या हाती लागले नसले तरी वाहनाच्या नंबरवरून, चेसिस नंबरवरून खऱ्या आरोपीचा माग घेणे पोलिसांना सहन शक्य आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणारे एपीआय किरण देशमुख यांना त्याबाबत विचारणा करण्यासाठी मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी कॉल स्वीकारला नाही. त्यामुळे या प्रकरणात खोलात पोलीस जाणार का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.