लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/देसाईगंज : देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून सुमारे ४ लाख ३२ हजार रुपयांची देशी दारू व २ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण ६ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना लागून आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातूनच यापूर्वी सर्वाधिक दारू आणली जात होती. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी झाल्यानंतर आता गोंदिया जिल्ह्यातून देसाईगंज मार्गे दारू आणली जात आहे. यावर आळा घालण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. १९ आॅगस्टच्या रात्री १० वाजता चारचाकी वाहनाने दारू आणली जात असल्याची गोपनिय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यानुसार देसाईगंज पोलिसांनी कुरखेडा मार्गावर टी पार्इंटजवळ सापळा रचला.अर्जूनी कुरखेडा मार्गे येत असलेल्या वाहनाची तपासणी केली असता, वाहनात ७ हजार २०० बॉटल देशी दारू आढळून आली. या दारूची किंमत ४ लाख ३२ हजार रुपये होते. दारूसोबतच वाहन सुध्दा जप्त केले आहे. वाहनाची किंमत २ लाख ५० हजार रुपये होते. असा एकूण ६ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन चालक आकाश योगराज ओमकार, प्रविण रमेश बघेल, संतोष बगमारे तिघेही रा. गोंदिया यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई देसाईगंजचे ठाणेदार प्रदीप लांडे, सहायक फौजदार दयानंद नागरे, सदाशिव धांडे, भावेश वरगंटीवार, संतोष नागरे, लोमेश कन्नाके, दीपक लेनगुरे, विजय नंदेश्वर यांनी केली. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.काही वेळेला छत्तीसगड राज्यातीलही दारू देसाईगंज मार्गे गडचिरोली जिल्ह्यात आणली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. छत्तीसगडमधील दारू अतिशय खराब राहत असल्याने या दारूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दारूवरही नियंत्रण आवश्यक आहे.स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन लाखांची दारू जप्तस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली शहराजवळील कोटगल येथे सापळा रचून दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाळत ठेवली. एक संशयास्पद चारचाकी वाहन कोटगल गावाकडे येत असल्याचे निदर्शनास आले. सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनात १ लाख ८७ हजार २०० किमतीची विदेशी दारू आढळून आली. वाहनात १३ सिलबंद बॉक्स होते. चिल्लर विक्रेत्यांना घरपोच पुरवठा करण्याकरिता दारूची वाहतूक केली जात होती. दारूसोबतच दोन लाख रुपये किमतीचे वाहन सुध्दा जप्त केले आहे. या प्रकरणी मुडझा येथील संदीप तुळशीराम गोवर्धन, वेलतूर तुकूम येथील पुरूषोत्तम गंगाधर मंगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार खुशाल गेडाम, हेमंत गेडाम, तानू गुरनुले, नुतेश धुर्वे, रमेश बेसरा यांनी केली.
सहा लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:00 AM
देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून सुमारे ४ लाख ३२ हजार रुपयांची देशी दारू व २ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण ६ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना लागून आहेत.
ठळक मुद्देवाहने ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखा व देसाईगंज पोलिसांची कारवाई