शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

प्रमुख सहा मार्ग अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 5:00 AM

सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच सखल भागातील शेतजमिनीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे धानपीक व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. छत्तीसगड राज्या झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला दाब निर्माण होऊन या नदीचे पाणी भामरागडात शिरले आहे.

ठळक मुद्देपाण्याचा जोर सुरूच : गोदावरी, इंद्रावती नदीकाठच्या गावांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गुरूवारी दुपारपासून गडचिरोलीसह जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सहा मार्ग बंदच आहेत. पर्लकोटा नदीच्या पाण्याचा वेढा भामरागडला कायम आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच सखल भागातील शेतजमिनीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे धानपीक व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. छत्तीसगड राज्या झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला दाब निर्माण होऊन या नदीचे पाणी भामरागडात शिरले आहे. इंद्रावती, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गोसेखुर्द धरणाचे २५ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. वर्धा, वैनगंगा, प्राणहिता नद्यांच्या पाण्याची पातळी धोकापातळीच्या खाली आहे. कालेश्वरम केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे. मेडिगड्डा बॅरेजचे ६५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठावरील गावकऱ्यांना सावध करण्यात आले आहे.जगदलपूर, चिंदनार, पातागुडम केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. मानापूर केंद्रावरील नोंदीनुसार पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सामान्य आहे. मात्र इंद्रावती नदीच्या बॅक वॉटरमुळे पर्लकोटा नदी फुगली आहे.पर्लकोटाच्या पुलावरून जवळपास दोन मीटर पाणी वाहात आहे. पुन्हा पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भामरागडमधील जवळपास ५० घरे व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना दुसरीकडे हलविण्यात आले.नाल्यात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यूकमलापूर - वेडमपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या अर्कापल्ली येथील नरेश सिंगा सडमेक (३५) हा शेतकरी बुधवारी सायंकाळच्या सुमारास शेतातून गावाकडे परत येत असताना नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. नरेश हा बुधवारी शेतावर गेला होता. दरम्यान दिवसभर कमलापूर परिसरात दमदार पाऊस झाल्याने नाल्याचे पाणी वाढले. त्या पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना प्रवाह अधिक असल्याने वाहून गेला.पुरामुळे हे मार्ग आहेत बंदर्पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी असल्याने आलापल्ली-भामरागड हा मार्ग बंद आहे. आलापल्ली ते हेमलकसा दरम्यान अनेक लहान-मोठे नदी, नाले आहेत. याही नाल्यांवर पाणी आहे. सोमनपल्ली नाल्यावरील पुलावर पाणी असल्याने आसरअल्ली-सोमनपल्ली मार्ग बंद आहे. अमराजी नाल्याच्या पाण्यामुळे आलापल्ली-सिरोंचा, कोरेतोगू नाल्यामुळे रोमपल्ली-झिंगानूर, पीडमिली नाल्यामुळे हेमलकसा-करमपल्ली-सुरजागड मार्ग बंद आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर