लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निष्काळजीपणे वाहन चालवून हायमॉस्ट लाईटला धडक देऊन नुकसान करणाऱ्या वाहन चालकास गडचिरोली न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास व २ हजार ५०० रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.अशोक जोगय्या येलकुंचीवार रा. शिवलिंगपूर ता. अहेरी असे आरोपीचे नाव आहे. अशोक याने स्वत:च्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवून चामोर्शी मार्गावरील रोड डिवायडरवर लावलेल्या हायमॉस्ट लाईटला जोरदार धडक दिली. यामुळे हायमॉस्ट लाईट खाली कोसळला. यामध्ये पालिकेचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. अशी फिर्याद विद्युत विभाग प्रमुख सुनील घोसे यांनी तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात सबळ पुरावे आढळून आल्याने मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी ट्रक चालकाला सहा महिन्यांच्या सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. कलम १८४ अन्वये पुन्हा एक हजार रुपयांचा दंड व दड न भरल्यास १० दिवसांचा साधा कारावास, कलम २२९ अन्वये एक महिन्याचा साधा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १० दिवसांचा साधा कारावास सुनावला. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी काम पाहिले.
ट्रक चालकास सहा महिन्यांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:55 PM
निष्काळजीपणे वाहन चालवून हायमॉस्ट लाईटला धडक देऊन नुकसान करणाऱ्या वाहन चालकास गडचिरोली न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास व २ हजार ५०० रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.
ठळक मुद्देगडचिरोली न्यायालयाचा निकाल : हायमॉस्टला धडक देऊन केले नुकसान