गडचिराेली : स्वयंपाक चटपटीत व्हावा म्हणून अनेक जण मसाल्याच्या पदार्थांचा वापर करतात. ज्यांना मसाल्याच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम कळले आहेत, अशा महिला अल्प प्रमाणात मसाल्याच्या पदार्थांचा वापर करतात. गेल्या दाेन ते तीन महिन्यांत मसाल्याच्या पदार्थांच्या दरात किरकाेळ वाढ झाली आहे. केवळ खसखसच्या दरात किलाेमागे ५०० ते ६०० रुपये सर्वाधिक वाढ झाली आहे. गडचिराेली जिल्ह्यात माेजक्याच प्रमाणात मसाल्याच्या पदार्थांचा वापर हाेत असल्याने ग्राहकांवर फारसा परिणाम झाला नाही.
विविध कार्यक्रम व समारंभांमध्ये आयाेजित केलेल्या भाेजनात मसाल्याच्या पदार्थांचा वापर सर्वाधिक हाेता. याशिवाय शहरी भागातील हाॅटेल, खानावळ, उपहारगृहे आदी ठिकाणी मसाल्याच्या पदार्थांचा वापर केला जाताे, तर गृहिणी नाॅनव्हेजसाठी सर्वाधिक मसाल्याच्या पदार्थांचा वापर करतात. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने मसाल्याच्या पदार्थांना अल्प मागणी आहे. असे असले तरी जिल्ह्यात इतर हंगामांतही मसाल्याची मागणी अधिक नाही. गडचिराेली शहरात एक ते दाेन ठिकाणी मसाल्याची दुकाने आहेत. खेड्यापाड्यात मात्र मसाल्याची किरकाेळ विक्री केली जाते. रामपत्री, बदामफूल, काळे मिरे, जिरे, नाकेश्वरी, लवंग, जायपत्री, खसखस, कलमी यासह अन्य मसाल्याच्या पदार्थांची दैनंदिन खरेदी-विक्री हाेते; परंतु विशिष्ट प्रमाणातच या पदार्थांची विक्री हाेत असल्याने ग्राहकांवरही दर वाढल्याचा परिणाम जाणवत नाही. गडचिराेली जिल्ह्यात नागपूर येथून मसाल्याच्या पदार्थांची आवक हाेते; परंतु प्रत्येक मसाला दाेन ते तीन प्रकारचा असताे. त्याच्या प्रकारानुसार किमती ठरत असतात. मध्यम व हलक्या प्रतीच्या मसाल्याची किंमत कमी असल्याने ग्राहक त्याच पदार्थाची मागणी करतात. त्यानुसार मसाला विक्रेते ग्राहकांना वस्तू विक्री करीत असतात. इतर जिल्ह्यांत मसाल्याचे दर दुप्पट झाले असले तरी गडचिराेलीत स्थिर आहेत.
काेट
मसाला पदार्थांची किरकाेळ विक्री
नागपूर येथून मसाल्याचा स्टाॅक गडचिराेलीत बाेलवला जाताे. मागणी फारशी नसल्याने आवश्यकतेनुसारच दुकानात माल ठेवला जाताे. पदार्थांची किरकाेळ विक्री हाेत असल्याने व ५० ते १०० रुपयांपर्यंत दरवाढ झाल्याने जुन्याच पद्धतीने विक्री सुरू आहे.
- अन्वर काेठडिया,
मसाला व्यावसायिक
सध्या श्रावण महिना सुरू असल्याने मसाला पदार्थांच्या मागणीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. इतरही हंगामांत माेजक्या स्वरूपात व प्रमाणशीर पद्धतीने मसाल्याची मागणी ग्राहक करतात. त्यामुळे किमती किती प्रमाणात वाढतात याकडेही ग्राहक लक्ष देत नाहीत.
- सुनील कडस्कर,
मसाला विक्रेता
स्वयंपाक महागला
काेराेना महामारीचे संकट आल्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तू महागल्या. त्यामुळे महिलांना स्वयंपाक करताना जरा विचारच करावा लागताे, तरीसुद्धा महागाईची पर्वा न करता स्वयंपाक करावा लागते. सध्या काही मसाल्याचे दर वधारले आहेत. त्यामुळे मी याचा कमी वापर करीत आहे.
- सरिता काेलते, गृहिणी
साध्या भाजीसाठी आम्ही मसाल्याचे पदार्थ वापरत नाही. एखाद्या वेळेस नाॅनव्हेज असेल तरच मसाला वापरताे; परंतु ताेही अल्प प्रमाणात. श्रावण महिना सुरू असल्याने नाॅनव्हेज खाणे बंद केले आहे. त्यामुळे मसाल्याचे नेमके दर किती रुपयांनी वाढले, याबाबत माहिती नाही. दर वाढले असतील तर निश्चितच मसाले कमी वापरू.
- नीता भैसारे, गृहिणी