लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यात मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. सुमारे एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जात असतानाही रेती तस्करी करण्याची हिंमत केली जात आहे. यावरून महसूल विभागातील अधिकाऱ्यांसोबत रेती तस्करांचे साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे.सिरोंचा शहरात खासगी व शासकीय बांधकाम जोरात सुरू आहेत. त्यामुळे रेतीची मागणी वाढली आहे. रेतीसाठी बांधकाम थांबू नये, यासाठी दामदुप्पट किंमत मोजण्यास बांधकाम व्यावसायिक तयार आहेत. याचा गैरफायदा रेती तस्करांकडून घेतला जात आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजताच्या कालावधीत रेतीची तस्करी केली जात आहे. महसूल विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून आल्यानंतर रेती तस्करांची हिंमत पुन्हा वाढली आहे. रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. यामुळे शासनाच लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रात्रभर ट्रॅक्टरने वाहतूक होत असल्याने शहरवासीय कमालीचे त्रस्त आहेत. रेतीचे लिलाव झाले नसतानाही बांधकामावर मोठमोठे रेतीची ढिगारे दिसून येत आहेत. बांधकाम व्यावसायिकाकडे रॉयल्टी नसल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकावरही दंड ठोठावण्याची तरतूद आहे. मात्र महसूल विभागाचे अधिकारी कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. सिरोंचा तालुकास्थळी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह महसूल विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत. दस्तुरखुद्द सिरोंचात रेतीची तस्करी होत असताना या सर्व कर्मचारी वर्गाचे दुर्लक्ष झाले आहे.
सिरोंचात रेती तस्करी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:30 AM
सिरोंचा तालुक्यात मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. सुमारे एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जात असतानाही रेती तस्करी करण्याची हिंमत केली जात आहे. यावरून महसूल विभागातील अधिकाऱ्यांसोबत रेती तस्करांचे साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देप्राणहितामधील रेती होतेय गायब : महसूल विभागासोबत साटेलोटे