गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ते दाेन वर्षांपासून जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे प्रत्यक्ष वर्ग बंद आहेत. विद्यार्थ्यांविनाच शाळा सुरू आहेत. परिणामी शहरी व ग्रामीण भागातील जि. प. शाळा इमारतीच्या सभाेवताल झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे साप व विंचवाचा धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काेराेनाची दुसरी लाट आटाेक्यात आल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने काेविडमुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यास परवानगी देण्यास आली. त्यानुसार शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील हे वर्ग सुरू आहेत. इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीनेच घरबसल्या विद्यार्थी करून घेत आहेत. काेराेना संकटामुळे प्रत्यक्ष शाळा न भरल्याने विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान हाेत आहे. विद्यार्थ्यांविना ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांची परिसर स्वच्छता माेहीम पूर्णत: थंडावली असल्याचे दिसून येते.
बाॅक्स .....
वर्गखाेल्यांमधील धूळ हटेना
n ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटले की, विद्यार्थी व लाेकसहभागातून शाळा परिसराची स्वच्छता करणे, आवश्यक त्या किरकाेळ साेयीसुविधा करणे, विविध कार्यक्रम घेणे, राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत जनजागृती करणे आदी कामे येतात. मात्र, ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्याने बंद वर्गखाेल्यांमध्ये धूळ साचली आहे.
बाॅक्स ...
जबाबदारी काेणाची?
ग्रामीण भागात गावपातळीवर शाळा व्यवस्थापन समिती गठीत केली जाते तसेच शिक्षक-पालक संघ असताे. या समितीच्या माध्यमातून शाळांची विविध कामे, शाळा सुविधा व गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाते. मात्र, विद्यार्थ्यांविना शाळा बंद असल्याने बऱ्याच शाळा अस्वच्छतेच्या गर्तेत सापडल्या आहेत. शाळा व परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? असा प्रश्न आहे.
बाॅक्स .....
खासगी शाळांमध्ये स्वच्छता
खासगी व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शेकडाे शाळा आहेत. सातवीपर्यंतचे वर्ग बंद असले तरी खासगी व्यवस्थापनाच्या शाळा दरराेज उघडल्या जात आहेत. येथे शिक्षक, परिचर व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने शाळा व परिसराची नियमित स्वच्छता ठेवली जात आहे.
बाॅक्स .......
शिक्षक हजेरी ९५ टक्क्यांवर
जिल्हा परिषदेंतर्गत दीड हजारवर अधिक शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये जवळपास ३ हजार ८०० शिक्षक कार्यरत आहेत. काेराेनामुळे प्रत्यक्ष वर्ग बंद असले तरी ९५ टक्के शिक्षक उपस्थित राहत आहेत.
काेट .....
सिराेंचा तालुक्याच्या आसरअल्ली भागातील आमच्या शाळेत सध्या ऑनलाईन पद्धतीनेच वर्ग घेतले जात आहेत. सर्व विद्यार्थी येत नसले तरी आम्ही शिक्षकांनी परिसरात स्वच्छता करून घेतली. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक शाळेत नियमित हजेरी लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
- उत्तमराव म्हशाखेत्री, शिक्षक.