लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी सुमारे १३ हजार ३७५ नागरिक काेराेनाला हरवून काेराेनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे एकूण बाधितांच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे ७४.२९ टक्के एवढे आहे. या आकड्यांकडे लक्ष घातल्यास काेराेनाला हरविणे सहज शक्य असल्याचे दिसून येते. मागील वर्षभराच्या कालावधीत सुमारे १८ हजार ४ नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. सरकारमार्फत विविध उपाय याेजले जात असले तरी मागील १५ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, तसेच काेराेनामुळे ३११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काेराेनाशी संबंधित चर्चा करताना नागरिक प्रामुख्याने नकारात्मक असलेल्या बाबींवरच जास्त बाेलतात. त्यामुळे ऐकणाऱ्याला काेराेना हा महाभयंकर राेग आहे. ताे झाल्यास मृत्यू अटळ आहे, असा गैरसमज निर्माण हाेऊन अनावश्यक भीती निर्माण हाेते. मात्र, काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांचे हे प्रमाण बाधितांच्या तुलनेत केवळ १.७३ टक्का एवढे आहे. म्हणजेच जवळपास ९८ टक्के नागरिकांनी काेराेनावर मात केली आहे. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. मृत्यू झालेल्यांपैकी काही रुग्णांनी सुरुवातीलाच उपचार केला नाही. अगदी शेवटच्या स्टेजवर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याने डाॅक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केल्यावरही त्याला वाचविता आले नाही किंवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांचाच मृत्यू झाल्याचे दिसून येते.
घाबरू नका, काेराेनाला आम्हीही हरविले
काेराेना हाेणार नाही, याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. तरीही काेराेनाची लागण झाल्यास वेळीच तपासणी करून रुग्णालयात दाखल हाेणे आवश्यक आहे. लवकर उपचार सुरू झाल्यास काेराेनाचा काहीच त्रास हाेत नाही. कृत्रिम ऑक्सिजनचीही गरज पडत नाही. -एकनाथ गेडाम, ज्येष्ठ नागरिक
समाजात काेराेनाविषयी नकारात्मक विचार पसरविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या राेगाविषयी अनावश्यक भीती निर्माण झाली आहे. मी स्वत: ६१ वर्षांचा आहे. मात्र, उपचारादरम्यान मला ऑक्सिजनची गरजच भासली नाही. डाॅक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे मी काेराेनातून पूर्णपणे बरा झालाे आहे. -देवाजी चापले, ज्येष्ठ नागरिक
काेराेनामुळे सर्वच रुग्ण गंभीर राहत नाहीत. मी स्वत: घरीच राहून उपचार घेतला आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतर मी उपचार घेत हाेताे. मला थाेडा सर्दी, खाेकला हाेता. काेराेनाची चाचणी केल्यावर अहवाल पाॅझिटिव्ह आला. चार दिवसांतच सर्दी, खाेकल्याचा त्रास कमी झाला. -शिवराम मांदाडे, काेराेनामुक्त नागरिक