लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार १२२ शेतकऱ्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आली असली तरी प्रत्यक्षात २२ हजार ४०२ शेतकºयांच्याच खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. यात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे. मात्र राष्टÑीयकृत बँकांचे काम धिम्या गतीने सुरू आहे. दुसरीकडे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज थकबाकी असलेल्या शेतकºयांकडून कर्जवसुलीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र असणाºया ५८ हजार ९४७ शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या कर्जमाफीची एकूण रक्कम १३१ कोटी ५२ लाख ८८ हजार रुपये आहे. त्यापैकी तूर्त २८ हजार १२२ शेतकºयांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आली आहेत. त्यांना ७६ कोटी २६ लाख ९२ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र त्या नावांचीही पुन्हा पडताळणी सुरू आहे. त्यापैकी २६ हजार ७४६ शेतकºयांच्या नावांची पडताळणी झाली आहे. त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वळती करण्याचे काम सुरू आहे. ज्या २८ हजार १२२ शेतकºयांची नावे तूर्त ग्रीन लिस्टमध्ये आली आहेत त्यात २१ हजार ५५० कर्जदार शेतकरी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहेत. राष्टÑीयकृत बँकांचे ५६५९ तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे अवघे ९१३ कर्जदार शेतकरी आहेत.जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकºयांची निवड करून प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आणखी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दिड लाखांवर कर्जाची थकबाकी असणाºया शेतकºयांच्या बाबतीत येणारी अडचण मोठी आहे. त्यांना आताच कर्जमाफीतील फरकाची रक्कम भरण्याची सोय करावी लागणार आहे. मात्र अनेकांना याची कल्पना नाही.नियमित परतफेड करणाऱ्या ११ हजार शेतकऱ्यांना लाभआजापर्यंत ज्या शेतकºयांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यात ११ हजार ३८६ थकबाकीदार तर ११ हजार १६ शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करणारे आहेत. त्यांना १६ कोटी ४२ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे.३०,८२५ शेतकरी वेटिंगवरजिल्ह्यात आतापर्यंत कर्जमाफीसाठी निवडलेल्या शेतकऱ्यांपैकी ग्रीन लिस्टमध्ये नाव दाखल झालेले शेतकरी अर्ध्यापेक्षा कमी आहेत. अजून ३० हजार ८२५ शेतकºयांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली नाहीत. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून त्या शेतकºयांच्या खात्यांची आणि इतर बाबींची तपासणी केल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र नावे ग्रिन लिस्टमध्ये टाकली जातील. त्यानंतर पुन्हा बँक स्तरावर त्यांच्या नावांची, खाते क्रमांकांची पडताळणी करून नंतरच प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी त्यांना पात्र ठरविले जाणार आहे.दीड लाखावरील रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभशासनाकडून दीड लाखापर्यंतच कर्जमाफी दिली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांची कर्ज थकबाकी दिड लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना दिड लाखाच्या वरची रक्कम स्वत: भरायची आहे. ती रक्कम भरल्याशिवाय त्यांना दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. जिल्ह्यात असे १८१८ थकबाकीदार शेतकरी आहेत. त्यांची थकबाकीची एकूण रक्कम १८ कोटी ४८ लाख रुपये आहे.ग्रीन लिस्टमध्ये नावे आलेल्या दिड लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांबाबत प्रत्येक बँकेच्या शाखांना कळविले आहे. त्या शेतकºयांनी थकबाकीची रक्कम कोणत्या मुदतीत भरायची याबाबत अद्याप स्पष्ट निर्देश मिळालेले नाहीत. मात्र त्यांनी लवकरात लवकर दिड लाखांपेक्षा अधिकची रक्कम भरल्यास त्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल. सर्वच शेतकºयांकडे पैशाची सोय तातडीने होणे शक्य नसले तरी त्यांनी तसा प्रयत्न करावा.- सीमा पांडे,जिल्हा उपनिबंधक, गडचिरोली
आतापर्यंत २३ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:06 AM
जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार १२२ शेतकºयांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आली असली तरी प्रत्यक्षात २२ हजार ४०२ शेतकºयांच्याच खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. यात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे.
ठळक मुद्दे५७.२५ कोटी खात्यात जमा : १ हजार ८१८ शेतकºयांकडे दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी