लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार जिल्ह्यात २४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावर धान रोवणी झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही काही परिसरात धान रोवणीलायक पाऊस झाला नसल्याने रोवण्यांच्या कामाला गती आली नाही.गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्या टाकत असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने एटापल्ली, भामरागड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करतात.१३ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रावर धानाचे पऱ्हे टाकण्यात आले आहेत. पऱ्हे टाकलेल्या शेतकऱ्यांनी धान रोवणीला सुरूवात केली आहे. मागील १५ दिवसांपासून रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. पावसाचे प्रमाण असमान आहे. काही भागात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे रोवणीची कामे सुरू झाली नाही. ज्या भागात पुरेसा पाऊस झाला त्या भागात मात्र रोवणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी विभागाच्या आढाव्यानुसार २४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावर रोवणी आटोपली आहेत. प्रत्येक तालुक्यात जवळपास ३० ते ४० टक्केच रोवणीची कामे झाली आहेत.पुरेसा पाऊस झाला नसल्याने अजूनही तलाव, बोड्या अर्ध्याही भरल्या नाहीत. धानाचे पूर्ण उत्पादन होण्यासाठी तलाव व बोड्या पाण्याने पूर्ण भरणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे.७०९ हेक्टरवर मक्याची लागवडजिल्ह्यातील हवामान, पर्जन्यमान व जमीन मका पिकासाठी लाभदायक असल्याने मका पिकाचे चांगले उत्पादन होते. कमी खर्चात मक्याचे उत्पादन घेता येणे शक्य होत असल्याने काही शेतकरी मका पिकाची लागवड करीत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच आधारभूत धान खरेदी केंद्रावर मक्याची खरेदी करण्यात आली. त्यामुळे मक्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी मका पिकाच्या लागवडीकडे वळला आहे.सोयाबिन उत्पादक शेतकरी आता कापूस पिकाकडे वळला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत चालले असल्याचे दिसून येते. सुमारे १३ हजार ९४३ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.
आतापर्यंत २४ हजार हेक्टरवर धान रोवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 5:00 AM
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्या टाकत असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने एटापल्ली, भामरागड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करतात.
ठळक मुद्देअनियमित पाऊस । १,६८,४२० हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज