देसाईगंज : देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गावर असलेल्या जुन्या बसस्थानकावर महामंडळाच्या व खासगी वाहने उभी करण्यासाठी जागा उरत नाही. शिवाय दुकानदारांचे अतिक्रमण वाढल्यामुळे रस्ते अरूंद झाले आहे. परिणामी येथे वाहतुकीच्या काेंडीचा प्रश्न जटील झाला आहे. दुसरीकडे नव्या बसस्थानक निर्मितीचा प्रश्न कायम आहे. येथे कित्येक वर्षापासून मुख्य महामार्गावर असलेले बसस्थानक या ठिकाणी असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी हाेते. त्यातच परिवहन महामंडळाने बसफेऱ्या कमी झाल्याने या परिसरात रोजच प्रवाशांची प्रचंड गर्दी* असते. येथे मुख्य बाजारपेठ असून दिवसेंदिवस शहराची लाेकसंख्या वाढत आहे. वाहनांची संख्या दुपटीने वाढल्याने रस्ते कमी पडत आहेत. वर्दळीचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी वाहतुकीची काेंडी हाेत आहे. बसस्थानक बनविण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागील जागेवर भूमिपूजन कार्यक्रम आटोपण्यात आला परंतु बांधकामासंदर्भात अजूनपर्यंत कोणत्याही हालचाली दिसून येत नाही आहे. येथे नवीन बसस्थानक निर्मितीचा तिढा अजुनही कायम आहे.
बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
शहराच्या मध्यवर्ती भागातूनच हा महामार्ग जात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांची गर्दी* आहे. त्यातच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच ठेवल्या जात असल्याने फारच कमी रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध राहत असल्याने हा रस्ता नेहमीच गजबजलेला राहत असल्याने वाहतुकीची हेळसांड थांबविण्यासाठी बसस्थानकाचा तिढा सोडवून व कोरोना पूर्वकाळात जशा बसफेऱ्या होत्या, त्या पूर्ववत करुन मोठ्या प्रमाणात होणारी प्रवाशांची गर्दी* कमी करावी, अशी मागणी प्रवाशी विद्यार्थी व नागरीक करीत आहेत.
फाेटाे : देसाईगंज येथील बसस्थानकावर उसळलेली प्रवशांची गर्दी.