भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कार्यालयीन सचिव प्रा. गौतम डांगे यांनी बाैद्ध ‘धम्माची खास वैशिष्ट्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले. तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याण, दुःखमुक्ती, सदाचार, लोकशाही मूल्यांची जपणूक करणारा, इतर धर्माविषयी आदर करणारा, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेला तसेच दैवी चमत्काराला थारा न देणारा असल्याने प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनात बुद्ध तत्त्वज्ञानाचा अंगीकार केल्यास आयुष्य सुखकर होईल, असे प्रतिपादन डांगे यांनी केले. तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे आरमोरी तालुका अध्यक्ष गणपत शेंडे, रक्षा बन्सोड, शीतल सहारे, माया शेंडे, संध्या रामटेके, उपाध्यक्ष रमेश सोरदे, कोषाध्यक्ष अंजू रोडगे, शालिनी सुखदेवे, जयकुमार शेंडे, देवानंद वासनिक, पुंडलिक इंदूरकर, ताराचंद बन्सोड, प्रदीप रोडगे, कलीराम गायकवाड तसेच बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते. मंडळाचे सचिव किशोर सहारे यांनी बुद्धवंदना घेतली. उपाध्यक्ष जगदीश रामटेके यांनी उपस्थितांना खीरदान केली. प्रबोधन मालिकेचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव किशोर सहारे यांनी केले. आभार मंडळाचे अध्यक्ष यशवंतराव जांभूळकर यांनी मानले. शेवटी सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
220821\2012img_20210822_162304.jpg
आरमोरी येथील तथागत बुद्ध विहारात आयोजित प्रबोधन मालिकेत बोलताना प्रा. गौतम डांगे....