शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती असलेले डीसी सौरपंप उपलब्ध होणार. सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याला कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्याला ५ लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे. स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय ही आहे.
शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी / नाले यांच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी, पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी यांना या याेजनेचा लाभ घेता येईल. अटल सौर कृषिपंप योजना टप्पा-१ व २ किंवा मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार या याेजनेस पात्र ठरतील. २.५ एकर शेतजमीन धारकास ३ एचपी, ५ एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ एचपी व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ७.५ एचपी वा अधिक क्षमतेचे सौर कृषिपंप अनुज्ञेय राहणार आहेत. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी कुसुम - महाऊर्जा या संकेतस्थळावर भेट द्यावी. दि.१४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजतापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. योजनांच्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) नागपूर ०७१२-२५६४२५ व व पुणे कार्यालयातील दूरध्वनी क्र ०२० ३५०००४५० येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.