लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील कासवी ग्रामपंचायतीने गरजू कुटुंबीयांना घरकूल मिळण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेतला. मात्र शासन व प्रशासनाकडून घरकूल मंजूर करण्यात आले नाही. याशिवाय कासवी-पळसगाव मार्गावरील गाढवी नदीवर पूल नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शिवाय या भागात आरोग्याची समस्याही ऐरणीवर आली आहे. या मूलभूत समस्या मार्गी लावाव्या, या मागणीसाठी कासवीवासीय गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांना भेटून त्यांना निवेदन सादर केले. तसेच समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चाही केली. यावेळी कासवीचे माजी उपसरपंच प्रवीण रहाटे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. निवेदनावर कीर्तीलाल मेश्राम, प्रकाश गुरनुले, अनिता मडगाम, मंगेश मरस्कोल्हे, वनीता राऊत, सुनील पुराम, सुनीता गळे, सुनील मडावी, इंदिरा ढोरे, रितेश सडमाके, शेवंता गेडाम, रामदास उईके, अनिल शेंद्रे, दीपक दुपारे, स्वप्नील गुरनुले, क्रिष्णा मट्टे, ईश्वर गुरनुले, निकेश उईके, बाजीराव सयाम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.आदिवासींना शबरी घरकूल योजनेअंतर्गत घरकूल देण्यात यावे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मागासवर्गींना घरकूल देण्यात यावे, कासवी ते पळसगाव मार्गावरील गाढवी नदीवर पूल बांधण्यात यावा, कासवी येथे डीपी बदलवून देण्यात यावी, तसेच कासवी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्माण करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. गावात अनेक बीपीएलधारक गरजू लाभार्थ्यांकडे वास्तव्यासाठी पक्के घर नाही. तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आली नाही, असे म्हटले आहे.जुन्या डीपीने बत्ती गूलकासवी येथे गेल्या अनेक वर्षांपासूनची जुनी डीपी कायम आहे. पावसाळ्यात येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागते. सातत्याने मागणी करूनही महावितरणने डीपी बदलवून दिली नाही.
घरकूल, पुलाची समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 1:08 AM
तालुक्यातील कासवी ग्रामपंचायतीने गरजू कुटुंबीयांना घरकूल मिळण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेतला. मात्र शासन व प्रशासनाकडून घरकूल मंजूर करण्यात आले नाही.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कासवीवासीय जिल्हा कचेरीवर धडकले