लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील २८ विद्यार्थिनी आजारी पडल्या. एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे केजीबीव्हीतील समस्या १५ दिवसांच्या आत सोडवाव्या, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिला.डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना गुरूवारी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. तसेच विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. चर्चेदरम्यान उपस्थित कर्मचारी व विद्यार्थिनींनी विद्यालयातील अनेक समस्या मांडल्या. स्थानिक प्रशासन व शासनाच्या निष्काळजीपणामुळे तसेच लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विद्यालयात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एकीकडे सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ व स्वच्छ भारत मिशनची घोषणा देत असले तरी मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला.येथील कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करतात. पगारही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. येथील कर्मचाºयांना वेळेवर पगार द्यावा व त्यांची पगारवाढ करावी, गृहपालाचे पद भरावे, २४ तास गृहपाल व चौकीदार नेमावा, विविध योजनांद्वारे येणारा निधी वेळेवर वितरित करावा, पिण्याचे पाणी, उत्कृष्ट जेवण द्यावे, अशी मागणी करीत १०० विद्यार्थिनी प्रवेश मर्यादा असतानाही १८० विद्यार्थिनींची कशी काय भरती करण्यात आली. तसेच त्यांच्या निवासाची योग्य व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवालही डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला. यावेळी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, जि. प. सदस्य मनोहर पोरेटी, कल्पना वड्डे, अॅड. गजानन दुगा, नगरसेविका वंदना उंदीरवाडे, मंगला मडावी, रामचंद्र गोटा, जमीर कुरेशी, परसराम पदा, कुलदीप इंदूरकर, नरेश भैसारे, मिलींद किरंगे, भूषण भैसारे, विनोद लेनगुरे, बसीर पिराणी हजर होते.
केजीबीव्हीतील समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:18 AM
येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील २८ विद्यार्थिनी आजारी पडल्या. एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे केजीबीव्हीतील समस्या १५ दिवसांच्या आत सोडवाव्या, अन्यथा जिल्हाधिकाºयांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिला.
ठळक मुद्देकाँग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट : समस्या न सुटल्यास जिल्हाधिकाºयांना घेराव घालणार