आरमाेरी : मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यात विविध समस्या कायम आहेत. या समस्या निकाली काढण्यासाठी ठाेस कार्यवाही करावी व जिल्हावासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. डाॅ. देवराव हाेळी व आ.कृष्णा गजबे यांनी राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात दाेन्ही आमदारांनी मुंबई येथे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, लाेकसंख्येची तपासणी करून पेसा कायद्यांतर्गत समाविष्ट गावे कमी करण्यात यावी. जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण घटनात्मक तरतुदीप्रमाणे १९ टक्के करावे. वडस-गडचिराेली रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे. वळूमाता संगाेपन केंद्र परिसरात मंजूर असलेले गाेपालन व गाेसंवर्धन प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करावे. गाढवी, सती नदीवर बंधाऱ्याचे काम करून सिंचन सुविधा करावी. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे.
बाॅक्स...
स्वतंत्र सातबारे बनविण्याचे आदेश काढा
गडचिराेली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खातेफाेड करून स्वतंत्र सातबारे बनविण्याचे आदेश काढण्यात यावे, अशी मागणी आ.गजबे, आ.डाॅ.हाेळी यांनी राज्यपालांकडे केली. जिल्ह्यातील शेतकरी पिढ्यानपिढ्या एकाच सातबारावर असल्याने विकास झाला नाही. स्वतंत्र सातबारे मिळाल्यास शासकीय याेजनांचा लाभही घेता येईल, असेही त्यांनी राज्यपालांना सांगितले.