प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा सरचिटणीस आशिष धात्रक, चामोर्शी तालुका सल्लागार पुरुषोत्तम किरमे, गडचिरोली तालुका कार्याध्यक्ष संजय मडावी यांनी कक्ष अधिकारी नरड, वेतन अधीक्षक वैभव बारेकर,मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान, डिसेंबर २०२० चे वेतन लवकर निकाली काढणे. शिक्षकांचे मासिक पगार सीएमपी ऑनलाईन प्रणालीद्वारे करणे, सन २०१९-२० च्या जीपीएफ पावत्या देणे. पेन्शन केस मंजूर करणे, शिक्षकांचे वैद्यकीय बिल मंजूर करणे, वैद्यकीय बिल मंजूर करणे, नियमित संदर्भातील प्रस्तावांची पडताळणी करुन मंजूर करणे, चट्टोपाध्याय प्रस्ताव प्रकरणे निकाली काढणे, स्थायी प्रस्ताव प्रकरणे, ४ टक्के सादील अनुदान, जिल्ह्यातील जि. प. हायस्कूलच्या शिक्षकांचे नोव्हेंबरचे वेतन त्वरित अदा करण्यात यावे, गडचिरोली जिल्हा परिषदेतील पदावनत मुख्याध्यापकांना त्वरित मूळ पदावर पदस्थापना देण्यात यावी, सर्व संवर्गातील शिक्षकांना २४ वर्षानंतर निवडश्रेणीचा लाभ विनाअट देण्यात यावा, जि.प.मधील शिक्षण समितीवर राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा एक प्रतिनिधी (आमंत्रित सदस्य)घेण्यात यावे. जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,उच्चश्रेणी मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक तसेच बांग्ला भाषिक शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी. मुख्याध्यापकांना शालेय आर्थिक व्यवहार करताना १ हजारच्यावर रक्कम काढता येत नाही, ही अट रद्द करण्यात यावी, बी.एल.ओ.सह इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढून घ्यावी, विजाभज, इमाव, विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रस्ताव सादर करताना आवश्यक केलेली विद्यार्थ्यांच्या (स्वत:च्या) जातीच्या प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी. जिल्ह्यातील विज्ञान विषय शिक्षकांना पदवी उत्तीर्ण केल्यानंतर सेवा ज्येष्ठतेप्रमाणे पदवीधरची वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्यांवर भर देण्यात आला.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:33 AM