लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शिक्षक, विद्यार्थी व अन्य घटकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या समस्या त्वरित मार्गी लागाव्या, यासाठी शिक्षक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कुलगुरू डॉ.नामदेव कल्याणकर यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. कुलगुरूंनी सदर समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही घडामोडीमुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत असून या प्रकरणी जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, विद्यापीठाच्या उन्हाळी २०१८ च्या परीक्षेच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेतील अवैध गुणवाढ प्रकरणातील दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अनेक वर्षांपासून विद्यापीठाने आचार्य पदवीकरिता पीईटी परीक्षा घेतली नसल्याने नवसंशोधनास चालना मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेऊन विद्यापीठस्तरावर पीईटी परीक्षेचे आयोजन करावे, आचार्य पदवीसाठी कोर्सवर्क परीक्षेच्या निकालात झालेल्या संभ्रमाबाबत विद्यापीठाने भूमिका स्पष्ट करावी, इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम शैक्षणिक सत्राच्या मध्यंतरी बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असून भविष्यात असे होऊ नये, यासाठी योग्य दक्षता घ्यावी. अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षकेरिता नेमलेल्या परीक्षकांचे आणि विषय मॉडरेटरचे मानधन चार ते सहा महिने होऊन अप्राप्त आहे. सदर मानधन निकाली काढावे, याकरिता सुनिश्चित धोरण तयार करावे, समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या स्थान निश्चिती संदर्भातील समस्यांची सोडवणूक करावी, यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.चर्चेदरम्यान कुलगुरू डॉ.नामदेव कल्याणकर, प्र-कुलगुरू डॉ.चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, गोंडवाना शिक्षण मंचाचे सचिव डॉ.रूपेंद्र गौर, डॉ.अरूणा प्रकाश, डॉ.सुरेश खंगार, डॉ.हंसा तोमर, डॉ.सचिन वझलवार, संजय रामगिरवार, प्रशांत दोंतुलवार, मनीष पांडे, डॉ.परमानंद बावनकुडे, डॉ.पराग धनकर, डॉ.पंढरी वाघ, डॉ.गजानन बन्सोड, डॉ.उत्तम कामडे, डॉ.रवी धारपवार व अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन देताना डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, डॉ.अशोक खोब्रागडे, डॉ.किशोर वासुर्के, प्रा.यादव गहाणे, प्रा.प्रज्ञा वनमाळी, प्रा.योगेश पाटील, प्रा.विशाखा वंजारी, प्रा.गणेश चुधरी, तेजस मोहतुरे हजर होते.
विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:57 AM
गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शिक्षक, विद्यार्थी व अन्य घटकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या समस्या त्वरित मार्गी लागाव्या, यासाठी शिक्षक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कुलगुरू डॉ.नामदेव कल्याणकर यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
ठळक मुद्देअनेक विषयांवर चर्चा : शिक्षक मंचच्या पदाधिकाऱ्यांचे कुलगुरूंना निवेदन