अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात एकमेव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जिल्हास्तरावर गडचिरोली येथे आहे, मात्र तेथे अनेक समस्या असून त्या लवकर सोडवाव्या, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा चंद्रपूर जिल्हा निरीक्षक शाहीन हकीम यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात बंद असलेली इलेक्ट्रॉनिक्स शाखा सुरू करणे. जिल्ह्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रत्येक शाखा सुरू करणे, सध्या दोन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सुरू असलेल्या या महाविद्यालयात कर्मचारी तथा शिक्षकांची नियुक्ती करणे, महाविद्यालयाचा अनुशेष भरून काढणे, जिल्हा मुख्यालयात एम.एसस्सी पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना शिकता येते. अन्य कुठेही पोस्ट ग्रॅज्युएट उपलब्ध नाही त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना बी.एसस्सीनंतर पुढे शिकता येत नाही त्यामुळे सिरोंचा, अहेरी, कोरची भागातील महाविद्यालयात एम.एसस्सीसाठी मान्यता देण्यात यावी, अशी मागणी शाहीन हकीम व महिला पदाधिकाऱ्यांनी ना. सामंत यांच्याकडे केली.