काेट ......
आपल्याच शेतात ज्वारी पिकत हाेती
ज्वारीचे उत्पादन आपल्याच शेतात हाेत हाेते. गावातील ९० टक्के नागरिक ज्वारीचे उत्पादन घेत हाेते. त्यामुळे पूर्वीच्या काळी ज्वारीपासून भाकरी, कन्या, आंबिल बनवून खात हाेताे. उरलेली ज्वारी बाजारात नेऊन विकली जात हाेती.
- बीजा मडावी,
नागरिककाेट .....
सिंचनाची सुविधा नसल्याने ज्वारी हे एकमेव पीक घेतले जात हाेते. मात्र, ज्वारीच्या कन्या खाणे हे गरिबीचे लक्षण मानले जात हाेते. आर्थिक परिस्थितीने बरा असलेला व्यक्त भात खात हाेता. ग्रामीण भागात पाेळ्यांचा पत्ता नव्हता.
- दामाजी अंडलकर, नागरिक
काेट ......
आता गहूच परवडतात
रेशन दुकानातून महिन्याला आठ किलाे गहू व बारा किलाे तांदूळ उपलब्ध हाेतात. हेच धान्य महिनाभर पुरते. त्यामुळे गहू व तांदळाचाच वापर केला जाते.
- कविता चाैधरी, गृहिणी
काेट ........
ज्वारीपासून भाकरी बनविल्या जातात. मात्र, त्या कशा बनवायच्या आपल्याला माहीत नाही. उन्हाळ्यामध्ये आंबील बनविण्यासाठी ज्वारीचा वापर केला जाते.
- भाविका भांडेकर, गृहिणी
बाॅक्स ...
ज्वारीचे उत्पादन घटले
३० वर्षांपूर्वी गडचिराेली जिल्ह्याच्या ९० टक्के शेतीमध्ये ज्वारीचे उत्पादन घेतले जात हाेते. आता मात्र ज्वारीचे उत्पादन फार कमी शेतकरी घेतात. जेमतेम १०० ते २०० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. ज्वारीची जागा आता धान, कापूस, साेयाबीन, तूर या पिकांनी घेतली आहे.
बाॅक्स .....
आपल्या आराेग्याची श्रीमंत ज्वारीतच
-ज्वारीमध्ये फायबर, प्राेटिन, कॅल्शिअम, मॅग्निशिअम, पाेटॅशियम, लाेह भरपूर प्रमाणात असते. हे सर्व तत्त्व सुदृढ शरीरासाठी आवश्यक आहेत. ज्वारीमध्ये अँटी ऑक्सिडेंट तत्त्व आहेत.
- ज्वारीमध्ये फायबर माेठ्या प्रमाणात असल्याने वजन कमी हाेण्यास मदत हाेते.
- ज्या नागरिकांना मधुमेह आहे अशा नागरिकांना ज्वारी वरदान ठरते.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
ज्वारी व गव्हाचे भाव
वर्ष ज्वारी गहू
१९८० ४०० ६००
१९९० ६०० ९००
२००० १३०० १८००
२०१० २५०० २५००
२०२० ४००० ३०००
२०२१ ४५०० ३५००