निवेदनात, कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा द्यावा. समान काम समान वेतन या धर्तीवर राज्यातील सर्व कोतवालांना १५ हजार रुपये वेतन द्यावे. वेतनवाढ नाकारणारे परिपत्रक रद्द करावे. तलाठी पदासाठी कोतवालांना ५० टक्के आरक्षण द्यावे. वर्ग ४ शिपाई पदाच्या सर्व जागा काेतवाल संवर्गातून भराव्या. कोरोनामुळे मयत कोतवाल कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घ्यावे. शासकीय सेवा केल्यानंतर कोतवालांना १० लाख निवृत्तीभत्ता द्यावा, तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्यांचा समावेश हाेता.
निवेदन देताना कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष मोरेश्वर साखरे, उपाध्यक्ष राजेंद्र गेडाम, सचिव माणिक कोडापे, राकेश वाटगुरे, मधुकर नरोटे, नत्थू गावडे, राजेंद्र गेडाम, नेताजी वाघाडे, मंगेश कुळसंगे, दिवाकर पदा, जनार्दन जवादे, सुनील देवतळे, मधुकर बोदलकर, रेवनाथ मेश्राम, प्रदीप जक्कुलवार, अमित ठेंगणे, कालिदास मांडवगडे, राहुल कोहपरे, गणेश रतनपुरे, परशुराम कस्तुरे, संजय कुलसंगे व तालुक्यातील कोतवाल उपस्थित होते.