जुन्या हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये २०१५-१६ मध्ये नियुक्त झालेल्या हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना समाविष्ट करावे. जुन्या तसेच नवीन हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना एकाच चक्राकार पद्धतीने आदेश द्यावेत. सर्व हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, आदी मागण्यांसाठी साखळी उपाेषण सुरू आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वाखाली भेट दिली व उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून नवीन हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना हिवताप नियंत्रण कार्यक्रमामध्ये सामावून घेण्याची मागणी केली असता डॉ. मोडक यांनी सकारात्मक उत्तर देऊन नवीन हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना न्याय देणार, असे सांगितले. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळात प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, डी. डी. सोनटक्के, नेताजी गावतुरे, गणेश कोवे, घनश्याम वाढई, दिवाकर निसार, बाळू मडावी, क्रिष्णा मडावी, आदी उपस्थित होते. याप्रसंगी हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गीतेश खेवले, कोषाध्यक्ष अमोल ठाकरे, सचिव घनश्याम भांडेकर, आदी उपस्थित हाेते.
हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:24 AM