लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमध्ये बुधवारी दुपारी व गुरूवारी पहाटे दमदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नदी, नाल्यांना पूर आला. आलापल्लीतील काही घरांची पडझड झाली. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले.सिरोंचा- मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कंबालपेठाजवळील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने टेकडाताला व रेंगूठा गावासह या परिसरातील गावांचा संपर्क तुटला.जिमलगट्टा- आलापल्ली ते सिरोंचा मार्गावरील गोंविदगावजवळील नाल्यावर पाण्याचा प्रवाह वाढल्याने नाल्याच्या बाजूने असलेला रस्ता वाहून गेला. जिमलगट्टा परिसरातील किष्टापूर नाल्याला पूर आला. किष्टापूर गावात पाणी शिरले. या परिसरातील शेतीचे नुकसान झाले. जिमलगट्टा येथील रमेश चंदावार यांच्या घरात दोन फूट पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान झाले. मदना नैताम, बाजीराव मडावी, लिंगा आलाम, आनंद मिसाल या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले.कमलापूर- परिसरात बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली. त्यामुळे या परिसरातील वीज सेवा व भ्रमणध्वनीसेवा ठप्प झाली. रेपनपल्ली-कमलापूर मार्ग बंद पडला.आलापल्ली- बुधवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे घरातील जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. नागेपल्ली येथील वनविकास महामंडळच्या वसाहतीत पण प्रचंड नुकसान झाले आहे. गोंडमोहल्ला, साईमंदिर परिसरात नालीचे पाणी मंदिर परिसरातील घरांमध्ये शिरले. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. श्रमिक नगर वॉर्ड, गोलकर मोहल्ला, वॉर्ड क्र.६ मधील बजरंग चौक मधील घरात नाल्याचे पाणी शिरले. श्रमिक नगर मधील राऊत यांची झोपडी पडली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.शेकडो मेंढ्या पुरात वाहून गेल्याराजाराम - रेपनपल्ली परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. पुरात शेकडो मेंढ्या वाहून गेल्या. यातील जवळपास ५०० मेंढ्या मृतावस्थेत आढळल्या. इतर मेंढ्या वाहून गेल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम तळोधी येथील मेंढपाळ राजाराम जंगलात राहत होते. पोलीस निरीक्षक कटवलकर, पं.स.सदस्य भास्कर तलांडे, सरपंच विनायक आलाम, ग्रा.पं.सदस्य आनंदराव वेलादी, सतीश सडमेक, महादेव आत्राम, राहुल कंबगौणीवर, डॉ.लखाये यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. सदर मेंढ्या नितेश भीमा बोर्लवार, रमेश भिरा मुरकीवार, जयेश भीमा बोर्लवार, पैका भीमा बोर्लवार, साईनाथ पोचा मुरकीवार यांच्या मालकीच्या आहेत.
दक्षिण गडचिरोलीत जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:48 PM
अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमध्ये बुधवारी दुपारी व गुरूवारी पहाटे दमदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नदी, नाल्यांना पूर आला. आलापल्लीतील काही घरांची पडझड झाली. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले.
ठळक मुद्देमुसळधार पाऊस : शेती व घरांचे नुकसान; ठेंगण्या पुलांवरून पाणी