बाॅक्स
या ठिकाणांना भेट देण्याची संधी
- गाेसेखुर्द-घाेडाझरी-गायमुख-अड्याळटेकडीसाठी सकाळी ८ वाजता गडचिराेली येथून बस निघेल. ही बस त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता गडचिराेलीत परत येईल. यासाठी २१५ रुपये तिकीट आकारले जाणार आहे.
- ब्रह्मपुरी-चपराळ-नवेगाव बांध-इटियाडाेह या स्थळांसाठी सकाळी ८ वाजता बस निघेल. त्यासाठी २१५ रुपये तिकीट आकारली जाईल.
- अहेरी-कमलापूर (हत्तीकॅम्प)- वडधम-मेडीगड्डा-साेमनूर (त्रिवेणी संगम) यासाठी गडचिराेली येथून सकाळी ७ वाजता बस निघेल. सायंकाळी ६ वाजता बस गडचिराेलीला परत येईल. यासाठी ४१० रुपये तिकीट आकारले जाईल.
- सेमाना-मार्कंडादेव-चिचपल्ली (हनुमान मंदिर)-अजयपूर (झाेपला माराेती) यासाठी गडचिराेली येथून सकाळी ७ वाजता बस निघेल. सायंकाळी ६ वाजता बस परत येईल. यासाठी २६० रुपये तिकीट आकारले जाणार आहे.
काेट
पर्यटक व भाविकांच्या साेयीसाठी स्वतंत्र बसेस सुरू करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवाशांना ऑनलाईन नाेंदणी करता येणार आहे. तसेच अधिकची माहिती बसस्थानकावर उपलब्ध हाेईल. पुरेसे प्रवासी मिळाल्यानंतर बस साेडली जाणार आहे. कमी खर्चात अनेक पर्यटनस्थळे पाहण्याची संधी या बसमुळे उपलब्ध हाेणार आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.
- अशाेक वाडीभस्मे, विभाग नियंत्रक गडचिराेली