गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाने २0१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये विद्यार्थी कल्याणावर १७.४८ लाख रूपये खर्च करणार असल्याचे अंदाज पत्रकात म्हटले आहे. विद्यार्थी हा विद्यापीठाचा आत्मा आहे. बदललेल्या परिस्थिती विद्यार्थ्यांना औपचारीक शिक्षणाबरोबरच अनौपचारीक शिक्षणही महत्वाचे ठरले आहे. विद्यापीठातून पदवी घेतलेला विद्यार्थी केवळ शासकीय नोकरी न मागता त्याने काहीतरी वेगळे केले पाहिजे. यासाठी त्याच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासावर विशेष भर दिला जात आहे. चालू आर्थिक वर्षात युवक महोत्सवावर ४ लाख, विद्यार्थ्यांची गणवेश २ लाख, प्रवास खर्च २ लाख आदी बाबींवर मिळून १७.४८ लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे. मागील वर्षी १६.७१ लाख रूपये खर्च करण्यात आले होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाऐवजी त्यांना तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ विशेष प्रयत्नशिल असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)
विद्यार्थी कल्याणासाठी विशेष तरतूद
By admin | Published: May 24, 2014 11:35 PM