लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथे सुमारे तीन कोटी रुपये खर्चून आठ प्लॅटफार्म असलेले बसस्थानक बांधले जाणार आहे. या बसस्थानकाच्या कामाला गती आली आहे.गडचिरोली हे जिल्हा स्थळ आहे. तसेच मध्यवर्ती ठिकाण असल्याने जिल्हाभरातील बसगाड्या गडचिरोली बसस्थानकात येतात. तसेच दुसऱ्या जिल्ह्यात्ीलही बसेस गडचिरोली येथे येतात. प्रवाशी संख्या व बसगाड्यांची संख्या लक्षात घेतली तर गडचिरोलीचे बसस्थानक लहान पडत होते. त्यामुळे या बसस्थानकाचा विस्तार करून अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी होत होती. त्यानुसार शासनाने बसस्थानकाचा विस्तार व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी गडचिरोलीच्या बसस्थानकावर केवळ पाच प्लॅटफार्म होते. जुन्या इमारतीला लागूनच नवीन इमारत बांधली गेली आहे. त्यामुळे आता प्लॅटफार्मची संख्या नऊ वर जाणार आहे. एक वर्षापूर्वीच कामाला सुरूवात झाली होती. मात्र मध्यंतरी काम थांबले होते. बांधकामासाठी बसस्थानकाची अर्धी जागा टिनपत्रे लावून ताब्यात घेण्यात आली होती. त्यामुळे प्रवासी व बसेससाठी केवळ अर्धीच बसस्थानकाची जागा शिल्लक होती. काही बसेस महामार्गाच्या बाजुला लावल्या जात होत्या. प्रवाशी व बसगाड्यांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अडचण भासत होती. पावसाळ्यानंतर आता कामाने वेग पकडला आहे. बाजुच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रंगरंगोटीचे काम शिल्लक आहे. जुन्या बसस्थानकाचीही दुरूस्ती केली जात आहे. या ठिकाणी नवीन बाक तयार केले जात आहेत.विभागीय कार्यालय व प्रशिक्षण केंद्रासाठी स्वतंत्र इमारतगडचिरोली आगारात आदिवासी युवकांसाठी चालक प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. या केंद्रासाठी इमारत व उपविभागीय कार्यालयासाठी इमारत बांधली जाणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभाग आठ कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. आलापल्ली येथे सुध्दा दोन कोटी रुपये खर्चून बसस्थानक बांधले जाणार आहे. आलापल्ली बसस्थानकाचा निधी व जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरूवात होणार आहे.बसस्थानकात राहणार या सुविधाकॅन्टींगची दुरूस्ती केली जाणार आहे. याच इमारतीत पार्सल सुविधा, विद्यार्थ्यांसाठी पासेस सुविधा, हिरकणी कक्ष, पोलीस चौकी, जेनेरीक मेडीसीनचे दुकान राहणार आहे. महिला, पुरूष व अपंगांसाठी स्वतंत्र प्रसाधानगृहे बांधली जाणार आहेत. बसस्थानकाच्या संपूर्ण परिसराचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे. महामार्गाच्या बाजुला प्रवाशांच्या वाहनासाठी पार्र्किंगची सुविधा राहिल. तसेच एक लहानसा बगिचाही तयार केला जाणार आहे.
बसस्थानकाच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:21 AM
गडचिरोली येथे सुमारे तीन कोटी रुपये खर्चून आठ प्लॅटफार्म असलेले बसस्थानक बांधले जाणार आहे. या बसस्थानकाच्या कामाला गती आली आहे. गडचिरोली हे जिल्हा स्थळ आहे.
ठळक मुद्देनऊ फलाट राहणार : संपूर्ण परिसराचे होणार काँक्रीटीकरण; तीन कोटी रुपयांचा निधी आहे मंजूर