शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

विकास कामे करण्यास गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 10:51 PM

पावसाळा संपला असल्याने आता विकासकामे करण्यास गती द्या. प्रत्येक विभागाला ठरवून दिलेले उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी, अधिकारी व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे, ....

ठळक मुद्देदेवराव होळी यांचे निर्देश : गडचिरोली तालुक्याची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा संपला असल्याने आता विकासकामे करण्यास गती द्या. प्रत्येक विभागाला ठरवून दिलेले उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी, अधिकारी व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे सोमवारी गडचिरोली पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेची आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान आमदार डॉ. देवराव होळी यांनी निर्देश दिले. सदर बैठकीला पंचायत समिती सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा परिषद सदस्य निता साखरे, संवर्ग विकास अधिकारी पचारे, पं.स. सदस्य गोहणे, चिंचोळकर, गडचिरोलीचे नायब तहसीलदार आदी उपस्थित होते. आढावा बैठकीत आमदारांनी सर्व विभागांचा आढावा घेतला.रोलेक्स कंपनीचे मीटरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सदर मीटर कंपनीकडे परत करावे. गडचिरोली तालुक्याला ३ हजार ६२ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मार्च महिन्यापूर्वी सर्व शौचालयांचे बांधकाम करण्याचे निर्देश दिले. काही पाणी पुरवठा योजना बंद असून या योजना सुरू करण्याचे निर्देशही दिले आहे.ग्रामसेवकाला इतरांचे सहकार्य गरजेचेशौचालयाचे बांधकाम करवून घेऊन त्यांचा वापर नागरिकांनी करावा, यासाठी जनजागृती करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा व इतरही विभागांची आहे. मात्र हे काम केवळ ग्रामसेवकावर लादून इतर यंत्रणा मोकळ्या झाल्या आहेत. हागणदारीमुक्तीमध्ये संबंधित नागरिकाला शौचालय बांधण्याच्या कामासाठी प्रवृत्त करणे एवढेच काम ग्रामसेवकाचे आहे. मात्र शौचालयाचे बांधकाम झाले नाही, निधी रखडला किंवा शौचालय बांधूनही हागणदारीमुक्त गाव झाले नाही तर संबंधित ग्रामसेवकालाच जबाबदार धरले जाते. ही चुकीचे असून इतरही यंत्रणांना त्यांच्या कामाची जाणीव करून द्यावी, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर यांनी आढावा बैठकीदरम्यान केली.जलयुक्त शिवार अभियान कामाचा लागणार फलकसिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागात कोट्यवधी रूपयांची कामे केली जात आहेत. प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत किती कामे झाली. त्यासाठी किती निधी खर्च झाला. याबाबतचे फलक गावाच्या दर्शनी भागावर लावून सदर फलकाचे पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच किंवा गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या मार्फत लोकार्पण करण्याचे निर्देश दिले.