लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. या तारखेपूर्वी कोणत्याही परिस्थितीत शेतकºयांचे अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक सीमा पांडे यांनी केले.महाराष्टÑ शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेचा आढावा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात देण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, सहायक निबंधक प्रमोद पाटील, सुरजुसे, म्हस्के, बँकेचे मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर, स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक अरूण चौधरी, बँकेचे व्यवस्थापक टी. डब्ल्यू. भुरसे, एम. पी. दहिकर, सहायक व्यवस्थापक जी. के. नरड, सी. एम. तोटावार, पी. आर. खुणेकर यांच्यासह जिल्ह्यातील सेवा सहकारी, आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे व्यवस्थापक, बँकांचे व्यवस्थापक, निरिक्षक व सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.ज्या शेतकºयांनी अजूनपर्यंत अर्ज भरले नाही. त्यांनी अर्ज भरून घ्यावे, त्याचबरोबर शेतकºयांना अधिकाºयांनी सुध्दा सहकार्य करावे, कोणत्याही परिस्थितीत १५ सप्टेंबरपूर्वी सर्वांचे अर्ज भरावे, असे आवाहन पांडे यांनी केले.
कर्जमाफीचे अर्ज भरण्यास गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:55 AM
कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. या तारखेपूर्वी कोणत्याही परिस्थितीत शेतकºयांचे अर्ज भरून घ्यावेत, ....
ठळक मुद्देसीमा पांडे यांचे आवाहन : शेतकरी सन्मान योजनेचा आढावा