लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागडचा परिसर भूईमुगाच्या लागवडीसाठी प्रसिध्द आहे. सती नदीच्या तिरावर शेकडो हेक्टरवर भूईमुगाची लागवड केली जाते. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भुईमुगाची लागवड करण्यास वेग आला आहे.भूईमुग हे तेलवर्गीय महत्त्वाचे नगदी पीक आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शेतजमिनीत भूईमुगाचे पीक पाहिजे त्या प्रमाणा बहरत नाही. परिणामी शेतकरी भूईमुगाची लागवड करीत नाही. वैरागड परिसरातील सती नदीच्या किनाऱ्यावरील शेतजमीन मात्र भूईमुगासाठी अतिशय सुपीक आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी भूईमुगाची लागवड करतात. सप्टेबर महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापासून ते आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सर्वसाधारणपणे भूईमुग पिकाची लागवड केली जाते. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा कायम असल्याने भूईमुगाचे पीक चांगले येईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.कमी खर्चात भूईमुगाचे उत्पादन घेता असल्याने शेतकरी या पिकाला पसंती दर्शवितात. मागील वर्षी आरमोरी तालुक्यात ११० हेक्टर क्षेत्रावर भूईमुगाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी पेरणीचे क्षेत्र वाढून १५० हेक्टर एवढे झाले आहे. कुरखेडा तालुक्यात २०० हेक्टरवर पेरणी झाली आहे.त्याचबरोबर देसाईगंज, धानोरा या तालुक्यातीलही काही शेतकरी भूईमुग पिकाची लागवड घेत असल्याचे दिसून येते.नदीकाठी होते लागवडभूईमुगाच्या पिकाला जमिनीत शेंगा लागतात. त्यामुळे भूईमुग पिकाची जमीन भुसभुसीत असणे आवश्यक आहे. नदी काठचा परिसर वगळता इतर पसिरात अशी जमीन आढळत नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे नदी काठीच भूईमुगाची लागवड केली जाते. कुरखेडा तालुक्यातील सती नदी व आरमोरी तालुक्यातील वैलोचना, गाढवी, खोब्रागडी नद्यांचा परिसर भूईमुग पिकासाठी सुपीक मानल्या जातो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून भुईमुग पिकाची लागवड करीत आहेत.
भूईमुगाच्या लागवडीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 10:46 PM
वैरागडचा परिसर भूईमुगाच्या लागवडीसाठी प्रसिध्द आहे. सती नदीच्या तिरावर शेकडो हेक्टरवर भूईमुगाची लागवड केली जाते. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भुईमुगाची लागवड करण्यास वेग आला आहे.
ठळक मुद्देवैरागड परिसरात पेरणी : नदीकाठच्या परिसरात मशागत सुरू