लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानाकरिता राज्य शासन एच १४५ या कंपनीचे हेलिकॉप्टर ७२.४३ कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. हेलिकॉप्टरच्या एकूण किमतीपैकी ९५.१८ टक्के म्हणजेच ६८.९४ कोटी रुपयांची रक्कम संबंधित कंपनीला राज्य शासनाने अदा केली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.सध्या पोलीस दलाकडे असलेले हेलिकॉप्टर भाड्याने घेतलेले आहे. त्याच्या भाड्यापोटी वर्षाला कोट्यवधी रुपये द्यावे लागत आहे. पोलीस दलाला मिळणाऱ्या नवीन हेलिकॉप्टरमुळे ते भाडे वाचणार आहे.नक्षल्यांकडून करण्यात येणाºया कारवायांमध्ये कधीकधी पोलीस जवान जखमी होतात. दुर्गम भागातून त्या जखमी जवानांना वाहनाने आणण्यात वेळ जातो. शिवाय नक्षलवादी पुन्हा घातपात घडवून आणण्याची दाट शक्यता असते. तसेच जंगलातून जवानांना गडचिरोली किंवा अहेरीला आणेपर्यंत बराच उशीर होतो. परिणामी जखमी जवानांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे गडचिरोली पोलीस दलाला स्वतंत्र हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याची मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडून केली जात होती.तत्कालीन पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी भाडेतत्वावर घेतलेले हेलिकॉप्टर गडचिरोली पोलीस दलाला उपलब्ध करून दिले. या हेलिकॉप्टरचे महिन्याचे भाडे कोटीच्या घरात असल्याने स्वत:चे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने ८ मे २०१८ रोजी घेतला.लवकरच मिळणार नवीन हेलिकॉप्टरगडचिरोली पोलीस दलासाठी एच १४५ हे हेलिकॉप्टर घेतले जाणार आहे. हेलिकॉप्टरची एकूण किंमत ७२ कोटी ४३ लाख रुपये एवढी आहे. त्यापैकी ३५ कोटी ९४ लाख रुपये (५० टक्के रक्कम) यापूर्वीच अदा करण्यात आले होते. जून २०१९ मध्ये तांत्रिक बाबींची पूर्तता संबंधित कंपनीने पूर्ण केली असल्याने उर्वरित ५० टक्क्यांपैकी ४८ टक्के रक्कम म्हणजेच ३४ कोटी ५२ लाख २५ हजार रुपये अदा करायचे होते. त्यापैकी २३ कोटी एवढी रक्कम विमान चालन संचालनालयाला अदा करण्यात आली आहे. जवळपास ९५ टक्के रक्कम दिल्याने लवकरच स्वत:चे हेलिकॉप्टर गडचिरोली दलाला उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
हेलिकॉप्टर खरेदी प्रक्रियेला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:45 PM
नक्षलविरोधी अभियानाकरिता राज्य शासन एच १४५ या कंपनीचे हेलिकॉप्टर ७२.४३ कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. हेलिकॉप्टरच्या एकूण किमतीपैकी ९५.१८ टक्के म्हणजेच ६८.९४ कोटी रुपयांची रक्कम संबंधित कंपनीला राज्य शासनाने अदा केली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठळक मुद्दे९५ टक्के रक्कम कंपनीला अदा : ७२.४३ कोटी रुपये एकूण किंमत