शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
3
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
4
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
5
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
7
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
8
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
9
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
10
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
11
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
12
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
13
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
14
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
15
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
16
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
17
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
18
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
19
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
20
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

डीपीसीचा १०० टक्के निधी योग्य पध्दतीने वेळेत खर्च करा - जिल्हाधिकारी

By admin | Published: June 15, 2016 2:02 AM

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक पध्दतीने काम करण्याची गरज आहे.

गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक पध्दतीने काम करण्याची गरज आहे. विभाग प्रमुखांनी जिल्हा नियोजन मंडळाचा १०० टक्के निधी विहित वेळेत योग्य पध्दतीने खर्च करावा असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले. जिल्हा नियोजन मंडळ निधी खर्चाबाबतची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्यास सर्व साधारण गटात १६३ कोटी १४ लक्ष नियतव्यय मंजूर आहे. यापैकी ६ कोटी ८५ लाख ३४ हजार रूपयाची रक्कम यंत्रणांना बीडीएसवर वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्याचा वार्षिक आदिवासी योजना आराखडा २२ कोटी ७ लक्ष रूपयांचा असून आदिवासी उपयोजना आराखडा ३३ कोटी ४२ लक्ष रूपयांचा आहे. सर्वसाधारण गटाचा वाटप निधी व तरतूद झालेल्या नियतव्ययाचा जिल्हाधिकारी नायक यांनी आढावा घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनु गोयल, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, एस. राममूर्ती आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)मार्कंडासाठी स्वतंत्र निधीतीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत मार्कंडासाठी निधी प्रस्तावित आहे. यातून यात्री निवास बांधण्याचे नियोजन आहे. पर्यटन विकास योजनेंतर्गत मार्कंडासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.